35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महिला आमदारांची दारुबंदीची मागणी

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महिला आमदारांची दारुबंदीची मागणी

0
29

blank

नागपूर,दि.15 –यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात दारूबंदी लागू करावी यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या महिला आमदारांनी आज मंगळवारी विधानभवनाच्या पाय-यावर नारेबाजी करीत महसूल मंत्री एकनाथ खडसेंना साकडे घातले. या आमदारांनी विधानभवन परिसरात नारेबाजी केली.यापूर्वी स्वामिनी संघटनेच्या महिलांनी जिल्ह्यात दारूबंदीसाठी स्वाक्षरी अभियान, मोर्चे, धरणे, जिल्हाधिका-यांना निवेदन अशाप्रकारची वेगवेगळी आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.अधिवेशनादरम्यान मोठा मोर्चा सुध्दा दारुबंदीसाठी काढण्यात आला होता.यावेळी एका मुलीने आपल्या वडीलाचा मृत्युदारुमूळे झाल्याचे पटवून देत दारुबंदीची मागणीही केली होती.त्याच मुद्याला घेऊन आज मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आ. विद्या चव्हाण, माजी महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड आदी महिला आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यावर नारेबाजी करीत राज्यात दारुबंदीची मागणी केली.

blank