दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत करा-आ.सुमन पाटील

0
24

नागपूर,दि.15- माजी गृहमंत्री स्व.आऱ.आर.पाटील यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमन पाटील या आज  सध्याचा डान्स बार कायदा तत्काळ रद्द करावा तसेच दुष्काळग्रस्त शेतक-यांना वाचविण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घेत आपल्या मतदारसंघातील सिंचन योजनांच्या मागणीला घेऊन विधानभवनाच्या पाया-यांवर उपोषणाला बसल्या होत्या.त्यांच्या उपोषणाची दखल संसदीय कार्यमंत्री गिरिष बापट यांनी लगेच घेत त्यांच्या मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन दिल्याने श्रीमती पाटील यांनी उपोषण मागे घेतले.

मिरज पूर्वभाग, कवाडे महाकाळ, ताजगाव पूर्वभाग, सांगली, जत या पाच दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी वरदान ठरणारी ‘महसाळ योजना’ तत्काळ सुरु करावी, सातबारावर पाणीपट्टीच्या रकमेची नोंद करू नका, नाजगाव, कवठे महाकाळ मध्ये चालू असलेला मटका बंद करण्यात यावा आदी मागण्यांसाठी आ. सुमन पाटील व आ. विद्या चव्हाण या उपोषणाला बसल्या होत्या.यावेळी आमदार अजित पवार,आमदार जोगेंद्र कवाडे हे सुध्दा उपस्थित होते.