मोदी पहिल्‍यांदाच जहाजात कमांडर्ससोबत मीटिंग

0
10
वृत्तसंस्था 
कोच्ची-,दि.15  पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्‍या केरळ दौ-यावर आहेत. मंगळवारी कोच्‍चीमध्‍ये तीनही सेनांच्‍या वतीने त्‍यांना गार्ड ऑफ ऑनर देण्‍यात आले. त्‍यानंतर मोदी ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेवर आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. तेथे त्‍यांनी तिन्‍ही सेनांच्‍या प्रमुखांची भेट घेतली. विक्रमादित्‍य हे देशातील एकमेव विमान वाहतूक करणारे जहाज आहे. या जहाजात पंतप्रधानांनी मिटींग घेण्‍याची ही पहिली वेळ आहे.
 विक्रमादित्‍यवर आयोजित कार्यक्रमानंतर नौदलाचे जवान शक्‍तीप्रदर्शन करणार आहेत. आयएनएस विक्रमादित्यवरून मिग-29 ची टेकऑफ आणि लँडिंग होणार आहे. 10 पेक्षा अधिक जहाज या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
वाचा, आयएनएस विक्रमादित्यचे वैशिष्‍ट्ये 
– हे भारतीय नौदलाचे सर्वात शक्‍तीशाली जहाज आणि एकमेव विमानवाहू नौका आहे.
– या जहाजाला रशियामध्‍ये तयार करण्‍यात आले. पुढील 15 वर्ष हे जहान सर्व्हिस देणार आहे.
– हे जहाज तरंगणा-या शहरासारखे आहे.
– 1600 पेक्षा अधिक जवान या जहाजात तैनात राहू शकतात.
– या जहाजावरील जनरेटर 18 मेगावॅट वीज निर्माण करू शकते.
– रशियावरून खरेदी केलेल्‍या या जहाजाला नवीन रूप देण्‍यासाठी भारताला 15 हजार कोटी रूपये खर्च करावे लागले.