41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय मनसेच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

मनसेच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

0
17

blank

गोंदिया :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व प्रदेश सरचिटणिस हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांनी पदाधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. यात देवरी तालुका अध्यक्षपदी निलेशकुमार शाहू, आमगाव शहर अध्यक्षपदी नवीन असाटी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पियूष लांजेवार यांची नियुक्ती केली आहे. हेमंत गडकरी यांनी सदर तिघांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, उपाध्यक्ष मुन्ना गवळी, सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रिजभूषण बैस, गोंदिया शहर अध्यक्ष सुरेश ठाकरे, गोरेगाव शहर अध्यक्ष यासिन शेख व अभय कुरंजेकर उपस्थित होते.

blank