दिव्यांगांच्या विकासाकरिता जिल्हा परिषद सदैव तत्पर

0
10

गोंदिया,दि.6 : सर्व सामान्य मुलांपरी दिव्यांग मुलांनाही शिक्षणाचा लाभ मिळावा, त्यांनाही समाजाचा उत्पादक घटक म्हणून जगता यावे. त्यांच्या मधील कलागुणांना वाव मिळावा याकरिता कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद निधीची कमतरता पडू देणार नाही व त्यांच्या विकासाकरिता जिल्हा परिषद सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी केले. ते ग्राम कुडवा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात सर्व समावेशक संसाधन कक्ष व शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्तवतीने आयोजित दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय सांस्कृतीक कार्यक्रमाच्या उद््घाटनीय कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थानी सरपंच शैलेश वासनिक होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य खुशबू टेंभरे, पंचायत सदस्य कीर्ती पटले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश राऊत, जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी एल.एम. मोहबंशी, तंटामुक्त समिती अध्यक्ष हंसराज हट्टेवार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य योगेश्‍वरी बोपचे, संगीता पटले, प्रमिला बोपचे, ग्रामपंचायत सदस्य योगीता भालाधरे, गुरुनाथ दिहारी, जीतेश टेंभरे, ग्राम विकास अधिकारी राजेश बागडकर, केंद्र प्रमुख प्रदीप डोंगरे, शाळेच्या मुख्याध्यापिका जे.एस. पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाची कल्पणा मांडणारे जिल्हा समन्वयक विजय ठोकणे व त्यांचे सहकारी गजानन धावडे, राजकुमार गौतम, विकास लिल्हारे व चंद्रकुमार धुवारे यांचे विशेष कौतूक केले. दुपारी कार्यक्रम सुरु असतना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा मेंढे यांनी भेट देऊन अर्धा तास कार्यक्रमाचा आनंद घेतला व दिव्यांग मुलांचे कौतूक केले.
कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातून ७१ दिव्यांग मुलांनी सहभाग घेऊन आपल्या कलांचे प्रदर्शन केले. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी व गावकरी मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाला दिपा बिसेन व भूषण गजभिये यांनी केलेल्या बहारदार संचालनाने कार्यक्रमात आणखी भर घातली. प्रास्ताविक धावडे यांनी केले. संचालन ठोकणे यांनी केले. आभार मुख्याध्यापिका ज्योती पाटील यांनी मानले.