भाजपच स्वतंत्र विदर्भ करणार

0
8

भंडारा दि.6: मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची दखल न घेणार्‍या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भावर सातत्याने अन्याय केला. परंतु, स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत केंद्र व राज्य सरकारचे धोरण स्पष्ट असून स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा भाजप सरकारच्याच कार्यकाळात होईल, असा विश्‍वास विदर्भ विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार दत्ता मेघे यांनी व्यक्त केला.
विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या भंडारा जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी विदर्भ विकास परिषदेच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर विश्रामभवनात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
यावेळी मेघे म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भात सामाजिक कार्य सुरू आहे. आरोग्य सुविधा व कुपोषण निमूर्लन, बालमजुरी व बाल गुन्हेगारी रोखणे, ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र मिळवून देणे, शेतकरी मार्गदर्शन शिबिर, तरूणांना रोजगार मिळवून देणे, गरजुंना मदत करण्यासाठी परिषदेचे काम सुरू आहे.
काँग्रेसचा खासदार असताना आपले सामाजिक कार्य पक्षाला रूजले नाही, त्यामुळे आपणास हे काम बंद करण्यासाठी बजावण्यात आले होते. त्यानंतर नाईलाजास्तव परिषदेचे काम बंद करावे लागले.