43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ भंडारा पोलिसांचा ‘अँप’ लवकरच

भंडारा पोलिसांचा ‘अँप’ लवकरच

0
21

blank

भंडारा दि.12: जिल्ह्यात पोलीस व नागरिकांमधील समन्वय वाढविण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला प्रभावी करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. मोबाईलमध्ये डाउनलोड करता येऊ शकतो, असा ‘अँप’ लवकरच सुरू करणार असून हा अँप १५ दिवसात सुरू होईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
यावेळी त्या म्हणाल्या, पोलीस प्रशासनाची कार्यप्रणाली पारदश्री आणि लोकाभिमुख करण्यासाठी जिल्ह्यात काही प्रभावी पाऊल उचलले जात आहे. यात नागरिकांशी सुसंवाद करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइटस, फेसबुक, आणि व्हाट्सअँप वर जिल्हा पोलीस प्रशासनाचा अकाऊंट सुरू करण्यात आला आहे.त्यावरच एका क्लिकवर पोलिसांशी संपर्क होऊ शकतो.यासाठी अँप बनविण्यात येत आहे.

blank