गोंदिया हस्तशिल्प जिल्हा म्हणून विकसित होणार

0
12

 

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.१२: वनवैभवाने समृध्द असलेल्या गोंदिया जिल्हयात मोठ्या प्रमाणात साग, बांबू व अनेक वृक्ष आहेत. जिल्हयातील अनेक गावातील नागरिक व बुरड समाजातील व्यक्तींकडे हस्तशिल्प तयार करण्याचे कौशल्य आहे. त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त हस्तशिल्प गुणांना हेरुन त्यांना आणखी चांगल्या प्रकारचे हस्तशिल्प निर्मितीचे प्रशिक्षण देवून यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करुन गोंदियाची ओळख हस्तशिल्प जिल्हा म्हणून नावारुपास आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
जिल्हयात हस्तशिल्पकला हा रोजगाराचा एक प्रमुख स्त्रोत म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने जिल्हा हस्तशिल्प विकास मंचाची स्थापना करण्यात आली. या मंचाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी असून जिल्हास्तरीय इतर अधिकारी व सेवाभावी संस्था ह्या सदस्य आहेत.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हयातील महिलांच्या बचतगटांना यामध्ये समाविष्ट करुन, कारागिरांचे गट करुन त्यांना रोजगार देणे तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजना हस्तशिल्प कारागिर व सामान्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. कलात्मक वस्तू तयार करणाèया कारागिराची संख्या वाढविण्याचे प्रयत्न या मंचाकडून करण्यात येणार आहे.
कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालय परिसरात जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्हयात हस्तशिल्पकलेचा विकास करण्याच्या दृष्टीने तसा प्रस्ताव महाराष्ट्र लघू उद्योग विकास महामंडळ व विकास आयुक्त दिल्ली यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुर्यंवशी यांनी दिली.
देशभर होणाèया प्रदर्शनामध्ये स्थानिक कारागिरांना बाजारपेठ मिळावी व शासनाच्या विविध योजनामधून निधी पुरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हयात एकूण उपलब्ध कारागिर, मास्टर टड्ढेनरची उपलब्धतेचा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाèयांवर आहे. नागझिरा अभयारण्याच्या चोरखमारा व मंगेझरी गेट, नवेगावबांधच्या जांभळी गेट व नगरपरिषद येथे स्टॉल तसेच अदानी पॉवर गेस्ट हाऊस येथे हस्तशिल्प वस्तू विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
हस्तशिल्पकलेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वनविभागाच्या सहकार्याने राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा येथे शिल्पग्राम तयार करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र पुढाकार घेत आहे. वनविकास महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य शासकीय कार्यालयात गोंडी पेंटीग लावण्याचे तसेच हस्तशिल्पकलेवर आधारित विविध उपक्रमाअंतर्गत पोस्टर पेंटींग स्पर्धा घेण्यात येणार आहे.

हस्तशिल्प विकास मंच समिती
जिल्हयातील अनेक गावातील नागरिक व बुरड समाजातील व्यक्तींकडे मोठ्या प्रमाणात हस्तशिल्प कलेचे सुप्त गुण लपलेले आहेत. त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासोबतच त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आणि हस्तशिल्प कला शिकण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तींना या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हस्तशिल्प विकास मंच समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उपवनसंरक्षक, वनविभाग, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा माहिती अधिकारी, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन, मुख्याधिकारी न.प., व्यवस्थापक खादी ग्रामोद्योग, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा समन्वय महिला आर्थिक विकास महामंडळ, व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, व्यवस्थापक लघू उद्योग विकास महामंडळ, बिरसा मुंडा कामगार संस्था, एएसकेएस संस्था सालेकसा, अंजली मागासवर्गीय बहूउद्देशिय संस्था सालेकसा, महिला महामंडळाचे प्रतिनिधी व प्रधानमंत्री ग्रामीण विकास फेलो हे या समितीचे सदस्य आहेत.