34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ रबी हंगाम पूर्व नियोजन व सेवा पंधरवाडा

रबी हंगाम पूर्व नियोजन व सेवा पंधरवाडा

0
38

blank

तिरोडा : तालुक्यातील नवरगाव येथे मंडळ कृषी अधिकारी पंकज जिभकाटे यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी कार्यालय तिरोडाच्या वतीने ‘रबी हंगाम पूर्व नियोजन शेतकरी प्रशिक्षण’ व ‘कृषी सामाजिक समावेशन सेवा पंधरवाडा’ कार्यक्रम पार पडला.

अध्यक्षस्थानी पंस सभापती कुंता पटले होत्या. याप्रसंगी प्रामुख्याने नवरगावचे सरपंच प्रकाश ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संगीता राहांगडाले, पोलीस पाटील पौर्णिमा रहांगडाले, प्रगतिशील शेतकरी यशवंत रहांगडाले, रामप्रकाश पटले, मार्गदर्शक मंडळ कृषी अधिकारी पी.एन. जिभकाटे, कृषी पर्यवेक्षक रजनी रामटेके, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी, उमेश सोनवाने उपस्थित होते.याप्रसंगी रबी हंगामात घेण्यात येणारे पिके, त्यांचे क्षेत्र, वाढ व बियाणे मागणी आदि विषयांवर नियोजनबद्ध मार्गदर्शनपर चर्चा करण्यात आली.

शेतकरी प्रशिक्षण

कार्यक्रमात सेवा पंधरवाडा अंतर्गत कृषी अभियांत्रिकीकरण, पी.एम. किसान सन्मान योजना, ई-केवायसी, फळबाग लागवड आदि योजनांची माहिती देण्यात आली. शेतकर्‍यांच्या समस्यांचे निवारण करण्यात आले. विविध योजना व तडतुडा किडींच्या निर्मुलनाकरिता जनजागृती करीत प्रभातफेरी काढण्यात आली.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन कृषी सहायक अरुणा गायधणे व प्रगतिशील शेतकरी यशवंत रहांगडाले यांनी केले. प्रास्ताविक कृषी सहायक उमेश वाघ यांनी मांडले. संचालन अरुणा गायधणे यांनी केले. आभार अमित तिबुडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कृषी सहायक प्रमोद डोहळे, संदीप मेश्राम, रोशनी बारई, कृषी सेवक मनीषा मेश्राम यांनी सहकार्य केले.

blank