
सडक अर्जुनी,दि.01-पोवार समाजाचा इतिहास खुप मोठा आहे,आपण ज्ङ्मापध्दतीने आपल्या जातीला संघटित करण्ङ्मासाठी प्रयत्न करतो,त्ङ्माचप्रमाणे आपण ज्ङ्मा प्रवर्गामध्ये मोडतो त्ङ्मा प्रवर्गाला विसरुन चालणार नाही.भारतीय राज्ङ्मघटनेने आपणाला जे काही अधिकार दिले ते जातीला नव्हे तर प्रवर्गाला दिले आहेत.त्ङ्मामुळे आपण ज्या ओबीसी प्रवर्गात मोडतो त्या प्रवर्गावर आज काही असामाजिक मनुवादी शक्तीने हल्ला करण्या, सुरवात केली आहे.त्ङ्मामुळे आपल्या जातीसोबतच ओबीसी प्रवर्गालाही बळकट करण्यासाठी संघर्षाची खरी वेळ आल्ङ्माचे विचार ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यानी व्यक्त केले.ते सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथे राष्ट्रीय पोवार क्षत्रीय महासभा द्वारा संचालित क्षत्रीय राजाभोज पोवार सांस्कृतिक पर्यटन केंद्र सडक अर्जुनीच्यावतीने राजाभोज नगरी येथे आयोजित पोवारी ईरा २०१६ कार्यक्रम व चक्रवती राजाभोज जयंती समारोहाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
आपला समाज शेतीवर अवलंबून असणारा समाज आहे.पण आज शेतीची बिकट परिस्थिती निर्माण झाली असून आपल्य पाल्याला चांगले शिक्षणही देऊ शकत नाही.त्ङ्मातच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी राज्ङ्मघटना लिहितांनाच ओबीसी प्रवर्गाला घटनेच्या ३४० कलमात अधिकार दिले आहेत.त्या अधिकाराची अमलबजावणी आजपयर्तच्ङ्मा सरकारने केली नाही, त्त्यामुळे आपण ज्या ओबीसीमध्ङ्मे मोडतो तो प्रवर्ग मागास राहिला आहे.तर आपल्ङ्मा समाजातील काही युवकांचे डोके मनुवादी संघटना धार्मकितेत गुंतवूण आपली कशी फसवणूक करतात हे सांगत आता तरी जातीला बळकट करीत असताना ज्या प्रवर्गामूळे आपल्ङ्माला सविधानिक अधिकार मिळतात त्या ओबीसी प्रवर्गाच्ङ्मा लढ्यात सहभागी होऊन हक्कासाठी लढण्ङ्माचे आवाहन केले.
यावेळी समारभांच्या उदघाटिका मोसम हरिणखेडे यांनी जातीच्या विकासासाठीच नव्हे तर आपला समाज कशा पुढे जाईल यासाठी आपण नेहमीच सोबत असल्ङ्माची ग्वाही दिली.तर सकाळी ११ वाजता महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते राजाभोज दिंडीचे उदघाटन राजाभोज प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी समितीच्ङ्मावतीने गोरेगाव पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी,देवरीच्ङ्मा नगराध्ङ्मक्ष सुमन बिसेन,गोंदिया पंचायत समितीच्ङ्मा सभापती स्नेहा गौतम,लोकजनचे संपादक प्रा.एच.एच.पारधी,बेरार टाईम्सचे संपादक खेमेद्र कटरे,बाजार समितीचे संचालक हिरालाल चव्हाण,जितेंद्र रहागंडाले,भुमेश्वर पटले व देवेंद्र तुरकर यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्ङ्मात आला.
कार्यक्रमाला डॉ.नरेंद्र पटेल,गुड्डू रहागंडाले,पृथ्वीराज रहागंडाले, अरविंद बिसेन, महेंद्र बिसेन,योगेश्वरी पटले, डी.बी.रहागंडाले,मंदा चौधरी,गायत्री पारधी, सौ.कमलेश्वरी गौतम,अनिल बिसेन,स्वप्निल पटले यांच्यासह समाजातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन किशोर पटले यांनी केले.प्रास्तविक विलास चव्हाण यांनी केले तर आभार लिलेश रहागंडाले यांनी मानले.




