33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय दे ‘धक्का’! शिवसेनेने केले शिवाजीच्या पुतळ्याचे अनावरण

दे ‘धक्का’! शिवसेनेने केले शिवाजीच्या पुतळ्याचे अनावरण

0
37

मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरील उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या हातावर तुरी देत गनिमी काव्याने शिवजयंतीच्या मुहूर्तावर उरकून टाकले. विमानतळ प्राधिकरणातर्फे बसविण्यात येणाऱ्या या पुतळ्याच्या अनावरणाचा भव्यदिव्य कार्यक्रम भारतीय कामगार सेनेने आयोजित करीत भाजपला या कार्यक्रमापासून चार हात दूर ठेवले. 

blank