36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय विदर्भाच्या आंदोलनासाठी राजीनामा देऊ- आ. डॉ. आशिष देशमुख

विदर्भाच्या आंदोलनासाठी राजीनामा देऊ- आ. डॉ. आशिष देशमुख

0
19

blank

कोंढाळी/ नागपूर : : मी भाजपचा असलो तरी आधी विदर्भाचा पुत्र आहे. त्यामुळे वेळ पडल्यास विदर्भाच्या आंदोलनासाठी राजीनामा देऊ, अशी घोषणा काटोलचे आ. डॉ. आशिष देशमुख यांनी कोंढाळी येथील कार्यक्रमात केली. कोंढाळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात पशुसंवर्धन व कृषी विभागाच्यावतीने आयोजित पशुपक्षी व कृषी प्रदर्शनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे माजी महाधिवक्ता o्रीहरी अणे होते. आ. देशमुख म्हणाले, विदर्भातील शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट आहे. त्यांच्या प्रगतीसाठी आपल्यापरीने जेवढे जमते तेवढे प्रयत्न करणे सुरू आहे.
शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहे, यासोबतच नवनवीन योजनांचा फायदा शेतकर्‍यांना देण्यासाठी आपला लढा सुरूच राहील. एवढेच नव्हे याच विदर्भातील शेतकर्‍यांसाठी, विदर्भाच्या आंदोलनासाठी o्रीहरी अणेंच्या शब्दावर आपण आमदारकीचा राजीनामाही देऊ, असे देशमुख यांनी जाहीर केले.

blank