आर.पी.चंद्रिकापुरे :शालेय जीवनापासून पाण्याचे महत्व कळावे

0
7

गोंदिया : पाण्याचे महत्व व त्याचे संबर्धन आज काळाची गरज झाले आहे. पाणी आहे तर आपण आहो याकरिता पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा प्रत्येक थेंब साठवून ठेवण्याची गरज आहे. यासाठी शालेय जीवनापासूनच पाण्याचे महत्व कळायला हवे, असे प्रतिपादन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आर.पी. चंद्रिकापुरे यांनी केले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने जलजागृती सप्ताहांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्य़ात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ‘पाणी वापरा’ व ‘ पाणी व स्वच्छता’ या विषयांवर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्य़ाला प्रमुख पाहुणे म्हणून आर.एस.मडके, अनिल इंगोले, संजय कटरे व विविध शाळांतील मुख्याध्यापक उपस्थित होते. सर्वप्रथम जलपूजन करून उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली.
प्रास्ताविकात इंगोले यांनी, शालेय जीवनापासून एक संस्कार म्हणून विद्यार्थ्यांत पाणी, त्याचे महत्व व संवर्धनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजीत केल्याचे सांगीतले. या स्पर्धेत शहरातील ५ शाळांतील २४ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यात भारतीय ज्ञानपीठ शाळेतील शिवम पटले, डिंपल कावळे, समीर भावे, प्रतीमा तेलसे, लोकेश्‍वरी दहीकर, बुद्धशिल ठवरे, संस्कृ ती झोडे, सानिया शेख, बंगाली शाळेतील राहूल विश्‍वकर्मा, नवीन डोलारे, यश उके, संत तुकाराम शाळेतील दुर्गा सौसकर, प्रियंका मेश्राम, शालीनी सतीकोसरे, जानकीदेवी चौरागडे शाळेतील नेहा लांजेवार, यश बोरकर, पौर्णिमा सुरसाऊत, हर्षीता झाडे तर सरस्वती शाळेतील दक्षता मडामे, लिना फरदे, निकीता गोबाडे, दिक्षा ठाकूर, रोहीणी उपवंशी व ग्लोरी कटरे यांना पुरस्कृत करण्यात आले. संचालन देवेंद्र खोपेकर यांनी केले. आभार भूमेश मेहर यांनी मानले