35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन

0
37

blank

गोंदिया,दि.09ः येथील जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरिक्षक जयेश भांडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.यावेळी प्रामुख्याने माजी नगरसेविका भावनाताई कदम,सामाजिक कार्यकर्त्या डाॅ.सविता बेदरकर,श्रीमती बाजपेई, सीमा बैतूले आदिंनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.याप्रसंगी जिल्हा वाहतुक शाखा, येथील महिला पोलीस अंमलदार कुर्वे,सैय्यद,वर्हाड़े, पवार, भोंगाड़े, चौरागड़े,जनबंधु आदी महीला अंमलदार उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व SSS coaching center mama chouk gondia यांचे तर्फे पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले.तसेच आभार पोलिस हवालदार ज़फर अली यांनी मानले.

blank