राष्ट्र उभारणीसाठी महिलांचे योगदान जरूरी-ठाणेदार पांढरे यांचे प्रतिपादन

0
28

पवनी /धाबे येथे जागतिक महिला दिन उत्साहात

अर्जुनी /मोर ता.9:- स्वातंत्र्यापूर्वीही महिलांनी देशासाठी ऐतिहासिक लढा दिला, आता स्वातंत्र्यानंतरही राष्ट्र उभारणीसाठी महिलांचे योगदान जरूरी आहे, असे प्रतिपादन नवेगावबांधचे ठाणेदार संजय पांढरे यांनी ( ता.8) केले.
तालुक्यातील पवनी /धाबे येथे आयोजित महिला मेळावा आणि महत्वाचे दस्तऐवज वितरण कार्यक्रमात ते उदघाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पवनी /धाबेच्या सरपंच पपीता नंदेश्वर या होत्या.
मंचावर सहाय्यक ठाणेदार जनाब अजहर शेख, माजी सरपंच शैलेंद्र भांडारकर, येरंडी/दर्रेचे सरपंच करणदास रक्षा, शिक्षिका भारती भेंडारकर तसेच कान्होली,रामपुरी आणि कोहलगावचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
दरम्यान पपीता नंदेश्वर,अजहर शेख, शैलेन्द्र भांडारकर, श्रीमती भेंडारकर यांनीही समायोजित विचार मांडले.
गोंदिया जिल्हा पोलीस आणि ग्रामपंचायत पवनी /धाबेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पवनी /धाबेच्या सरपंचांना उदघाटनपर आभा कार्ड चे वितरण करण्यात आले. दरम्यान पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत परिसरातील नागरिकांचे आधार कार्ड अपडेशन करणे, आभा कार्ड, पॅन कार्ड आणि आयुषमान कार्डचे वितरण करण्यात आले, यावेळी सुमारे 200 नागरिकांनी याचा लाभ घेतला. दरम्यान या प्रसंगी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात परिसरातील महिला सरपंच, शिक्षिका,आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीआई फुले आणि माता रमाई आंबेडकर यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच पराग कापगते यांनी,संचालन ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी तर आभार सदस्य विकास टेम्भूरणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या येसस्वीतेसाठी पोलीस विभागाचे रुद्रवाड, देशकर,आणि ग्रामपंचायतचे सदस्य दीपिका चुटे,शुशी मडावी, सुनंदा कवडो, जोशीला पंधरे, कैलाश पंधरे, टिकाराम दर्रो, देवकुमार हटवार, सतिश साखरे, आणि तुलाराम वाढई यांनी सहकार्य केले.