35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ तेंडुलकर दाम्पत्याने दिलेल्या वचनाची पूर्तता केली; ताडोबातील शाळकरी विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग...

तेंडुलकर दाम्पत्याने दिलेल्या वचनाची पूर्तता केली; ताडोबातील शाळकरी विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग व पुस्तकांची भेट

0
18

blank

चंद्रपूर : एखाद्याला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यास अनेकजण कामाच्या व्यापात विसरून जातात. सेलिब्रेटीच्या बाबतीत हा प्रकार नेहमीच होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. मात्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीझंझा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि स्कूल बॅग भेट स्वरूपात देण्याचे अभिवचन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व पत्नी अंजली यांनी दिले होते. दोन महिन्यानंतर ताडोबातील अलीझंझा शाळेला आठवणीने भेट देताना तेंडुलकर दाम्पत्याने दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूकडून ही भेट स्वीकारताना शाळेचे विद्यार्थी देखील गहिवरले. हा भावनिक प्रसंग आज ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीझंझा शाळेत उपस्थित असलेल्या सर्वांनी याची देही याची डोळा अनुभवला.

blank