25.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ ओबीसीं समाजाचे ९५००० कोटीचं अतोनात नुकसान-उमेश कोर्राम:मालेगावात ओबीसी यात्रेच स्वागत

ओबीसीं समाजाचे ९५००० कोटीचं अतोनात नुकसान-उमेश कोर्राम:मालेगावात ओबीसी यात्रेच स्वागत

0
8

मालेगाव –गेल्या ९० वर्षापासून ओबीसींची र्व स्वतंत्र जातीनिहाय जनगणना झालेली नाही जनगणनेत स्वतंत्र कॉलम नसल्यामुळे एकट्या महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे तब्बल ९५हजार व कोटी रुपयांचे अतोनात आर्थिक, न सामाजिक आणि राजकीय नुकसान होत आहे सरकार ओबीसी समाजाच्या क न्याय हक्काकडे सतत दुर्लक्ष करत न असून हा अन्याय आता सहन केला . जाणार नाही आगामी जनगणनेत र जातीनिहाय जनगणना आणि ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम दिला , गेला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन खेळण्याचा इशारा मालेगाव रे येथील सावित्रीबाई फुले चौकात , बोलताना ओबीसीं महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी केले.यावेळी ओबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे,मुकुंद अडेवार,अशोक काकडे,शंकर पाल,युवा कार्यकर्ता गौरव बिसेन आदी मंडल यात्रेतील सहकारीही उपस्थित होते.
ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी विदर्भातील अकरा जिल्ह्यातून चाललेली मंडल यात्राच्या जंगी स्वागताचे आयोजन बुधवारी (दि.५) रोजी सकाळी १० वाजता मालेगाव शहरातील ओबीसी समर्थकांकडून फटाक्यांच्या आतिषबाजीत, पुष्पगुच्छ पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. सत्यशोधकी कार्यकर्त्या प्रा. सविता
ओबीसींच्या जातीनिहा
अनिल बळी यांनी कुंकुम तिलक लावून ऊमेश कोर्राम यांचे स्वागत केले. यावेळी प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष बँक अरुण विश्वनाथ बळी, व्यवस्थापक दिलीप राऊत, अंबिका बँक व्यवस्थापक कैलासराव चोपडे, नगरसेवक योगेश रामचंद्र बळी, युवासेना शहर प्रमुख विकास सुभाष बळी, शिवसेना शहर प्रमुख संतोष बळी (सावकार),अक्षय संजय बळी, अक्षय वसंत बळी, फौजी गणेश भांदुर्गे, ढवळेश्वर फाउंडेशनचे रुपेश गणेश बळी, विजय प्रल्हाद बळी, लखन बळी, स्वानंद बळी, सागर बळी, केशव उर्फ बंडूभाऊ बळी, भगवान बळी, अनिल बाविस्कर, नंदू बळी (वाहक), केशवराव दत्तूजी बळी, बबनराव तांबेकर गुरुजी, काशिनाथ जागृत यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी या स्वागत सोहळ्याचे मुख्य संयोजक अनिल बळी यांनी प्रास्ताविक तथा आभार प्रदर्शन केले.
ओबीसी साठी लावलेली क्रिमिलियरची अट रद्द होईल, पदोन्नती आरक्षण मिळेल, केंद्रीय अर्थसंकल्पात दरवर्षी ओवीसींच्या कल्याणासाठी स‌द्यस्थितीत फक्त एक टक्का निधी देत आहे, जनगणना झाली तर एससी एसटी प्रमाणे १०० टक्के शिष्यवृत्ती मिळेल, पॉलिटिकल आरक्षण इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

blank