26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ एनडीआरएफ, नागपूर येथे क्विक हील फाउंडेशनतर्फे सायबर सुरक्षा जनजागृती अभियान

एनडीआरएफ, नागपूर येथे क्विक हील फाउंडेशनतर्फे सायबर सुरक्षा जनजागृती अभियान

0
8

नागपूर : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर क्विक हील फाउंडेशनतर्फे एनडीआरएफ, नागपूर येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एनडीआरएफचे अधिकारी व जवानांना सायबर गुन्ह्यांचे प्रकार, ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, बनावट लिंक, ओटीपी व पासवर्डची सुरक्षितता तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात मानसी भास्कर व वैदेही ठावकर यांनी सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती देत डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाच्या खबरदारीच्या उपायांची माहिती दिली. उपस्थितांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले. अशा जनजागृती उपक्रमांमुळे सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता वाढून सुरक्षित डिजिटल समाज घडविण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

blank