35.5 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे पोलिस भरतीमध्ये पात्र मुलींचा सत्कार

आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे पोलिस भरतीमध्ये पात्र मुलींचा सत्कार

0
101

blank

देवरी,दि.१३- देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील चार मुलींनी जिल्हा पोलिस भरतीमध्य़े बाजी मारली. या यशस्वी मुलींचा सत्कार प्रकल्प कार्यालयातर्फे नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात करून त्या मुलींचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरीचे अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर होते. याप्रसंगी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहायक प्रकल्प अधिकारी एच आऱ सरियाम आदी मान्यवर उपस्थित होते.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृह देवरी क्रमांक एक येतील कु.मीनाक्षी मडावी कु.दामिनी गुदेवार कु.ललिता खोबा कु.हेमलता मडावी या चार विद्यार्थिनीने 2023 या सत्रामध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करून यश संपादन केले. या यशाबद्दल वस्तीगृह समारोपय कार्यक्रमा प्रसंगी माननीय प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार साहेब तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक बनकर साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ मोमेंट्स देऊन त्यांचा गौरव व सत्कार करण्यात आला. अतिशय नक्षलगतग्रस्त व दुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील ज्या ठिकाणी वाहने इतर सोयी सुविधांचा अभाव असणाऱ्या गावातील या विद्यार्थिनींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून आपल्या प्रतिभेची चुनुक दाखविली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री राचेलवार यांनी वसतिगृहातील इतर विद्यार्थिनींना शिक्षण अतिशय अमूल्य भाग असून शिक्षणाने व्यक्ती घडतो या स्वरूपाचे मोलाचे मार्गदर्शन करून भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी शिपाई या पदापासून एक सर्वोच्च अधिकारी कसे बनता येईल, याबाबत मुलीना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थित सहाय्य प्रकल्प अधिकारी एच. आर.सरियाम यानीआदिवासी क्षेत्रातील विद्यार्थिनींनी प्रत्येक क्षेत्रात पुढे येणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार यांनी सुद्धा विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वस्तीगृह गृहपाल एम. एस. बढे यांनी केले.  संचालन वस्तीगृह विद्यार्थिनी रिंकी उइके व उपस्थितांचे आभार स्नेहा पंधरे यांनी मानले.