जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी आज होणार

0
17

गोंदिया, दि.19 : जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शैक्षणिक सत्र 2024-25 करीता इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘‘जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2024’’ गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील एकूण 31 परीक्षा केंद्रावर दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या दरम्यान घेण्यात येणार आहे. या निवड चाचणीकरीता गोंदिया जिल्ह्यातील एकूण 7001 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या चाचणीकरीता अर्ज सादर केले असतील त्यांनी https://navodaya.gov.in किंवा  https://cbseitms.rcil.gov.in/nvs या वेबसाईटला भेट देऊन आपली प्रवेश पत्रे प्राप्त करुन घ्यावीत. प्रवेश पत्राशिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 पर्यंत हजर राहावे. असे जिल्हा प्रशासन तसेच विद्यालय प्रशासन यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.