29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ चक्रवर्ती राजाभोज जंयती:हजारोच्या संख्येत समाजबांधवानी गोंदियात काढली विशाल महारॅली

चक्रवर्ती राजाभोज जंयती:हजारोच्या संख्येत समाजबांधवानी गोंदियात काढली विशाल महारॅली

0
47

blank

रॅलीमध्ये पारंपारीक वाजंत्रीसह खाचर आणि बैलबंडी हे आकर्षणाचे केंद्र ठरले..

गोंदिया,दि.14 : पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांची जयंती वसंत पंचमी पर्वावर साजरी करण्यात येते. यंदाही आज 14 फेबुवारीला सम्राट राजभोज जयंती उत्सव समितीच्यावतीन वसंत पंचमीच्या पर्वावर शहरात पवार प्रगतीशील मंच गोंदिया,कुडवा,सुर्याटोला, फुलचूर, छोटा गोंदिया, मुर्री,दवनीवाडा,तिल्ली मोहगाव,रापेवाडा आदी ठिकाणाहून आलेल्या रॅलीचे जयस्तंभ चौकात स्वागत करण्यात आले.त्यानंतर आज 14 फेब्रुवारीला जयस्तंभ चौकातून या महारॅलीला जयस्तंभ चौकातून महाॅरलीला शुभारंभ करण्यात आले.रॅलीला आमदार आमदार विजय रहांगडाले,कैलाशचंद्र हरीणखेडे, जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, जि.प.सभापती संजयसिंह टेंभरे, माजी खासदार खुशाल बोपचे,माजी आमदार हेमंत पटले, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले,पवार प्रगतीशील मंच अध्यक्ष अ‍ॅड.पृथ्वीराज चव्हाण,राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे,झामसिंग बघेले, पवार प्रगतीशिल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती, राजेश चव्हाण,सौ.धनिषा कटरे,महारॅली समिती अध्यक्ष पप्पू पटले, डॉ.प्रशांत कटरे आदींनी झेंडी दाखवून शुभारंभ केला.जयस्तंंभ चौक,गांधी प्रतिमा,दुर्गा चौक,गोरेलाल चौक मार्गे नेहरु चौकात रॅलीचे समापन करण्यात आले.गोंदियातील रस्त्यावर महारॅलीच्या निमित्ताने यावर्षी पोवार समाजाने सामाजिक शक्ती प्रदर्शन केले.गोंदिया तालुक्यातील हजारो पोवार समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.blank
या रॅलीमध्ये समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये पारंपारीक वाजंत्रीसह खाचर आणि बैलबंडी हे आकर्षणाचे केंद्र ठरले होते.जयस्तंभ चौक,गांधीप्रतीमा ,चादंणी चौक,गोरेलाल चौक मार्गक्रमण करीत रॅली नेहरु चौकात पोचली. त्याठिकाणाहून फूलचूर येथील रॅली फुलचूरकडे व मुर्री येथील रॅली मुर्रीकडे रवाना करण्यात आले.blank
गोंदियात निघालेल्या चक्रवर्ती सम्राट राजाभोज जंयती महोत्सवानिमित्त महारॅलीत समाजबांधवानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.या रॅलीत एड.टी.बी.कटरे,जितेश राणे,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले,राजेश चव्हाण,राजेश राणे, संजय रहागंडाले,पं.स.सदस्य स्नेह गौतम, जय पटले, मनोज रहागंडाले, गोवर्धन बघेले, गुणराज ठाकरे, सुभाणराव रहागंडाले, राजेश अंबुले, मोनु पारधी, दुर्गाप्रसाद बिसेन,राजीव ठकरेले,बी.डब्लू.कटरे, अनिल टेंभरे, शिशिर कटरे, महेंद्र बिसेन, भागचंद रहागंडाले, प्रा.संजीव रहांगडाले, किशोर भगत, प्रीती देशमुख, सुरेश पटले, पकंज पटले, हेमंत बघेले, युगराज रहागंडाले,अनिल रहागंडाले, अजित टेंभरे, मुर्री येथील समितीचे अध्यक्ष पंकज टेंभरे, सचिव संदिप शरणागत, उपाध्यक्ष मनोज रिनायत,सदस्य मुकेश रिनायत,  योगेश शरणागत, अशोक हरिणखेडे, भुवन रिनायत, उमेश पारधी, ओमप्रकाश पारधी, तिर्थराज रहागंडाले,विक्की बघेले, ओ.जे.बिसेन, शंकर पारधी,डाॅ.पारधी, छत्रपाल तुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.blank
यशस्वीतेकरीता महारॅली उत्सव समितीचे अध्यक्ष राजकुमार (पप्पु) पटले, पप्पू टेभंरे, उमेश पारधी, विक्की बघेले, प्रवेश बिसेन, दिनेश तुरकर, दीप्ति पटले, दुर्गाप्रसाद ठाकरे, संतोष पटले, दीपम देशमुख, बाबा बिसेन, पंकज पटेल, प्रवीण (बिट्टू) बिसेन, तिजेश गौतम, सचिन बोपचे, राहुल बिसेन, शोहिल कटरे, सहसचिव छत्रपाल चौधरी, ओमप्रकाश हरीणखेडे, संदीप तुरकर, शैलेश तुरकर, मुकेश पटले, गौरव हरीनखेड़े, दिनेश रहांगडाले, इंद्रकला ओमप्रकाश पारधी, सुरेश पटले, अजय रहांगडाले, ओमेश्वर (बाबा) चौधरी, बंटी बोपचे, ओमप्रकाश पारधी, मोनु रहागंडाले, अजय रहागंडाले, प्रवीण अंबुले, योगेश रहागंडाले, रोहित कटरे, चुनेश पटले, ओम रहांगडाले, पंकज चौधरी, रवि रिनायत, आशीष कटरे व नितिन कोल्हे यांनी सहकार्य केले.blank
रॅलीतील सहभागी समाजबांधवाकरीता दुर्गा कॅटर्स,संजू ठाकरे,भाजप,जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले, आमदार विनोद अग्रवाल यांची जनता पार्टी, आदी मित्र परिवाराच्यावतीने नास्ता व पाण्याची सोय करण्यात आली होती.blank

blank