गोंदिया,दि.२६ः सहा वर्षानंतर पुन्हा माजी आमदार रमेश कुथे हे शिवसेना पक्षात आज २६ जुर्ले रोजी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.त्यांच्यासोबत त्यांचे बंधू जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक राजकुमार कुथे यांनीही शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.गोंदिया विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
माजी आमदार रमेश कुथे कुटुंबियासह आज उबाठा शिवसेनेत करणार प्रवेश सहा वर्षानंंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश करून घरवापसी केली आहे. उद्धव बाळा साहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यावेळी उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव,शैलेष जायस्वाल,उपाध्यक्ष सुनिल लांजेवार,तालुका प्रमुख चुनेश पटले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.कुथे यांनी शिवबंधन बांधल्याने काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर पुर्णविराम मिळाला असला तरी माजी आमदार यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रुपेश कुथे यांनी मुबंईत उपस्थित असतानाही मात्र शिवसेनेत प्रवेश केलेला नाही,त्यामुळे रुपेश कुथे यांची भूमिका सुध्दा येत्या काळात महत्वाची राहणार आहे.
शिवसेना माजी आमदार कुथेंचा गडकरीच्या उपस्थितीत कार्यकत्र्यासह भाजप प्रवेश 1995 आणि 1999 असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर रमेश कुथे हे विधानसभा निवडणूक जिंकले आहेत.त्यानंतर मात्र २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाचे गोपालदास अग्रवाल यांच्या कडून पराभव पत्करावा लागला होता.त्यानंतर ते काही काळ राजकारणातून अलिप्त होते.2018 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता.त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते.मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती.त्यावेळी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती.पण,त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसीचा निर्णय घेतला आहे.




