24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home राजकीय माजी आमदार रमेश कुथे कुटुंबियासह आज उबाठा शिवसेनेत करणार प्रवेश

माजी आमदार रमेश कुथे कुटुंबियासह आज उबाठा शिवसेनेत करणार प्रवेश

0
866

गोंदिया,दि.२६ः सहा वर्षानंतर पुन्हा माजी आमदार रमेश कुथे हे शिवसेना पक्षात आज २६ जुर्ले रोजी प्रवेश करीत असल्याने गोंदिया विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीत चित्रे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कुथे हे आपल्या कुटुंबासह २५ जुर्लेला मुंबईला रवाना झाले होते.२०१९ मध्ये त्यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.आता सहा वर्षानंंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे हे आज ठाकरे गटात प्रवेश करून घरवापसी करणार आहेत. उद्धव बाळा साहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव,शैलेष जायस्वाल,उपाध्यक्ष सुनिल लांजेवार,तालुका प्रमुख चुनेश पटले यांच्यासह २५ जुर्लेला गोंदिया नगरपरिषदेतील भाजपचे माजी नगरसेवक व जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे,जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रुपेश कुथे हे रवाना झाले होते,ते मुंबईत दाखल झाले आहेत.
1995 आणि 1999 असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर रमेश कुथे हे विधानसभा निवडणूक जिंकले आहेत.त्यानंतर मात्र २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाचे गोपालदास अग्रवाल यांच्या कडून पराभव पत्करावा लागला होता.त्यानंतर ते काही काळ राजकारणातून अलिप्त होते.2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता.त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते.मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती.त्यावेळी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती.पण,त्यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसीचा निर्णय घेतला आहे.