जिल्हा परिषद प्रशासनामुळे ग्रा. पं. कर्मचारी वेतानापासून वंचित

0
2066

:9 सप्टेंबर ला धडक मोर्चा
गोंदिया,दि.०४ः- 5 ऑगस्ट पासून गोंदिया जिल्हा परिषदेकडे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचा वेतन अनुदानाची रक्कम रू पावणे 14 कोटी राज्य शासनाकडून जमा झालेली आहे. पण गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाकण्याची वेळ नसल्यामुळे जिल्ह्यातील कर्मचारी आर्थिक संकटात सापडले.अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्ह्यातील कर्मचारी 9 सप्टेंबरला गोंदिया जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून जवाब दो आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर यांनी दिली आहे.या पूर्वी कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्टला जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीवर मोर्चा धरणे आंदोलन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पूर्वी पंचायत कर्मचाऱ्यांचा वेतन अनुदान पंचायत राज ग्राम स्वराज अभियान पुणे मार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असे पण काही कारणाने ही रक्कम जि.प.कडे जमा झाली आहे.या बाबत महासंघाने अनेकदा निवेदने दिली, पंचायत समितीवर आंदोलन केले तसेच दि. 2 सप्टेंबरला मु.का.अधिकारी यांना निवेदन देवून चर्चा केली व लगेच 2 महिन्याचे तसेच एप्रिल ते जून या तीन महिण्याचे प्रलंबित वेतन देण्याचे आश्वासन दिले.मात्र 1 महिन्याचे वेतन पाठविले जि.प प्रशासनाच्या अश्या धोरणाच्या विरोधात व जिल्हा परिषद कडे जमा अनुदान सर्व कर्मचाऱ्यांचे खात्यात जमा करण्यात यावे., एप्रिल ते जून 2024 या तीन महिन्याचे ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहे. त्यांचे वेतन ऑगस्ट महिन्याचे वेतना बरोबर जमा करण्यात यावे, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एप्रिल 22चे प्रंलंबित वेतन एप्रिल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्‍यावर जमा करण्‍यायत यावे,माहे एप्रील ते जून 2024 या कालावधी मधील प्रलंबित कर्मचारी वेतन जिल्‍हा परिषद ला प्राप्‍त कर्मचारी अनुदान निधी मधुन करण्‍यात यावे,ग्रामपंचायत कडील शिल्लक वेतन हिस्सा,भविष्य निर्वाह निधी हिस्सा व राहणीमान भत्ता कर्मचारी यांना दिल्याबाबत पंचायत समिति स्तरावरून ग्राम पंचायत निहाय चौकशी करने,प्रत्येक महिण्‍याचे वेतन शासन हिस्सा पूर्ववत RGS प्रकल्‍प संचालक कार्यालय पुणे तर्फे ERP प्रणाली मध्ये अदा करण्यात यावे, शासन नि‍र्णय 10 जानेवारी 2024 नुसार 10ऑगष्‍ट 2020 ते 31/03/2022 या कालावधीमधी 19 महिन्याची वेतन फरकाची रक्कम त्वरित जमा करण्याच्या मागणीला घेवून 9सप्टेंबर ला होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना शामिल होण्याची विनंती मिलिंद गणवीर, चत्रुगण लांजेवार, महेंद्र कटरे, रवींद्र किटे,विष्णू हत्तीमारे,बुधराम बोपचे, आशिष उरकूडे, ईश्वरदास भंडारी,खोजराम दरवडे,महेंद्र भोयर, दीप्ती राणे यांनी केली आहे.