31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home गुन्हेवार्ता चिचगडला विद्यार्थीनींना घेऊन जाणारी एसटी बस अब्दुलटोला नाल्याजवळ कोसळली

चिचगडला विद्यार्थीनींना घेऊन जाणारी एसटी बस अब्दुलटोला नाल्याजवळ कोसळली

0
1905

देवरी,दि.३०:शुक्रवारला घडलेल्या शिवशाही बसच्या अपघाताचे चित्र डोळ्यासमोरून जात नाही तोच आज ३० नोव्हेंबरला देवरीबसस्थानकावरुन मिसपिर्री,केशोरी,आलेवाडा मार्ग चिचगडकडे निघालेल्या( बस क्रमांक एमएच ४०,एक्यु ६०५०) मानव विकास योजनेच्या बसच्या चालकाचे नियत्रंण सुटल्याने अब्दुलटोला गावाजवळील नाल्यात ही बस शिरल्याची घटना सकाळी ७.३०वाजेच्या सुमारास घडली.देवरी येथून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनीना घेऊन ही बस चिचगडकरीता रवाना झालेली होती.या बसच्या अपघातात जिवितहानी झालेली नसून विद्यार्थीनींना किरकोळ जखमा झाल्याचे वृत्त आहे.काल शिवशाही बस अपघातात ११ विष्पाप बळी गेल्याची घटना ताजी असतांना आज सकाळी देवरी परिसरात बस अपघात झाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकांच्या हलगर्जीपणावर प्रवाशात नाराजी व्यक्त केली जात आहे.बस नाल्यात शिरल्याचे कळताच देवरी पोलीसांनी घटनास्थळ गाठून बस बाहेर काढण्यास सुरवात करीत विद्यार्थींनींना इतर वाहनाने हलविले आहे.