40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ पिटेसूर जंगल शिवारात वाघाने घेतला मासेमाराचा बळी

पिटेसूर जंगल शिवारात वाघाने घेतला मासेमाराचा बळी

0
96
file photo

भंडारा : तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त पिटेसूर जंगल शिवारात दि.५ डिसेंबर रोजी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली. जंगलालगतच्या तलावावर मासेमारी करिता गेलेल्या मासेमारावर वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले. लक्ष्मण डोमा मोहनकर (६०) रा. पिटेसूर असे मृतकाचे नाव आहे.

मृतक हा दि.४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान तलावावर मासेमारीकरिता गेला होता. रात्र होऊनही मृतक घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी गावकर्‍यांच्या मदतीने रात्रीदरम्यान शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहाटे पोलिसांसह वनअधिकार्‍यांनी परिसरात शोध मोहीम राबविली असता आज सकाळी लक्ष्मण मोहनकर याचे (Tiger Attack) प्रेत छिन्नविछिन्न अवस्थेत दिसून आले. शरीराचा बहुतांश भाग गायब होता.

एक पाय शरीरापासून वेगळा दिसून आला. वाघाने त्याचेवर हल्ला चढवून ‘ार केल्याचा वनविभागाकडून सांगितले जाते. वनविभागाकडून घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. तसेच परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. नरभक्षी वाघावर पाळत ठेवण्यासाठी एक तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली. घटनास्थळी वनअधिकार्‍यांनी जाऊन पाहणी केली. या अगोदर सुध्दा पाळीवर जनावरांवर हल्ले करून (Tiger Attack) अनेक जनावरांचा बळी घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण असून वाघाची दहशत कायम असल्याने याचा फटका शेतकरी, पशुपालक, नागरिक व विद्यार्थ्यांना बसत आहे. वाघाच्या बंदोबस्ताकरिता वनविभागाने उपाययोजना करून नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे.