
जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर व तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गोंंदिया/तिरोडा,दि.१७-महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाच्यावतीने काढण्यात आलेल्या शास निर्णयानुसार गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव,देवरी,सालेकसा व गोंदिया तालुक्यांना नक्षलग्रस्त क्षेत्र ठरवित शासनाच्या नक्षलग्रस्त धोरणानुसारच्या सर्व योजना लागू करण्यात आल्या आहेत.त्यातच जिल्ह्यातील तिरोडा,गोरेगाव, सडक अर्जुनी आणि आमगाव तालुक्यांना वगळल्याने या ४ तालुक्यांमधील कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला असून शासनाच्या नक्षलग्रस्त धोरणानुसार मिळणार्या आर्थिक लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.त्यातच जिल्ह्यातील नक्षल घटनांचा आढावा घेत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात नक्षल हालचाली होत असल्याने वगळलेल्या तालुक्यांचाही नक्षलग्रस्त भागात समावेश करण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर व तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहे.
या भागांना नक्षलग्रस्त क्षेत्रात समाविष्ट करावे जेणेकरून पोलिस,शिक्षण किंवा इतर विभाग असो, कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेल्या अनेक सुविधा यापुढेही उपलब्ध राहतील आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल उंच राहील.त्यांना सुरक्षा कवचात ठेवण्यात येईल.या चारही तहसीलमधील कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे.आमदारांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की गोंदिया जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि मध्य प्रदेश प्रांताच्या जवळ आहे.जिथे नेहमीच नक्षलवादी कारवायांच्या बातम्या येत असतात.त्यामुळे उर्वरित तहसील नक्षलग्रस्त घोषित करण्यात यावे.





