
गोंदिया तालुक्याची आरोग्य विषयक आढावा सभा
गोंदिया, दि.18 जुलै – तालुकास्तरीय आरोग्य विषयक आढावा सभा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विषयक कामाचा आढावा घेण्यात आला.आढावा भेटीत डॉ.गोल्हार यांनी आरोग्य संस्थेतील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी संस्थात्मक प्रसुती वाढविणे,सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व योजना यांची प्रभाविपणे अंमलबजावणी करुन कार्यक्रम व योजना गावपातळीतील शेवटच्या टोकापर्यॅत जनमानसात पोहचविण्याचे निर्देश दिले.
आढावा सभेप्रसंगी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव, क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे,कुष्ठरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भाग्यश्री गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये विविध राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी, प्रगती आणि अडचणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती देण्यात आली तसेच कार्यक्रमांमध्ये अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यामध्ये सुधारणा करण्याचे व लाभार्थ्यांपर्यंत सेवा प्रभावीपणे पोहोचवण्याचे निर्देश दिले.ही बैठक आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
तालुकास्तरीय आढावा सभेत एचएमआयएस पोर्टल डाटा एन्ट्री,संशयित पोलिओ रुग्ण शोध मोहीम,माता व बाल संगोपन कार्यक्रम,सर्पदंश उपचार व प्रतिबंध,सिकलसेल कार्यक्रम,कर्करोग तपासणी कार्यक्रम,अंसासर्गिक आजार निंयत्रण कार्यक्रम,नियमित लसीकरण,साथरोग,अँनिमिया मुक्त भारत अभियान,संस्थात्मक प्रसुती, नियमित लसीकरण,कुपोषण,नवसंजीवनी योजना इ.विषयांचा आढावा व मार्गदर्शन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी केले.तसेच क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा व मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी केले.कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा आढावा डॉ.भाग्यश्री गावंडे यांनी घेतला.हिवताप विभागाचा आढावा डॉ.विनोद चव्हाण यांनी घेतला.आढावा सभेत तालुक्यातील नऊही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सलील पाटील यांचे सह आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायिका,उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका व आशा गट प्रवर्तक उपस्थित होते.





