37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ ST कल्याण समिती:जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या जबाबदारी पत्राची तारीख चुकली?

ST कल्याण समिती:जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या जबाबदारी पत्राची तारीख चुकली?

0
634

blank

अनुसूचित जमाती कल्याण समिती मंगळवारपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर

समितीचे प्रमुख आमदार दौलत दरोडा गोंदियात दाखल,विविध नेत्यांच्या घेतल्या भेटी

गोंदिया, दि.28 : महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती दि.29 ते 31 जुलै 2025 या कालावधीत गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यानुसार समितीचे प्रमुख असलेले आमदार दौलत दरोडा हे गोंदियात दाखल झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व आदिवासी संघटनाच्या प्रमुखांशी भेट घेत चर्चा केली.तिरोडा तालुक्यातील सुकडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य जगदिश बावनथडे यांनी समिती प्रमुखांची भेट घेत तिरोडा तालुका नक्षलग्रस्त करण्यासंदर्भात तसेच आदिवासी योजनांच्या अमलबजावणीसंदर्भात चर्चा केली.यावेळी त्यांच्यासोबत डाॅ.प्रेमकुमार रहांगडाले,अशोक शहारे,नानु मुदलीयार,करण टेकाम आदी उपस्थित होते.

दरम्यान या समितीच्या देखऱेखीकरीता जिल्हाधिकारी यांनी विविध विभागप्रमुखांना जबाबदारी दिली आहे.त्या जबाबदारी देण्यात आलेल्या पत्रात अनेक चुका असल्याचे पत्र बघितल्यावर निदर्शनास आले आहे.वास्तविक या आधी ही समिती एप्रिल महिन्यात येणार होती,त्यानंतर मे-जून महिन्यात दौरा ठरला होता,या वेळेत समिती जिल्ह्यात आली नाही.ही समिती आज दाखल झाली आहे.या समितीतील सर्व आमदारांच्या सोयीकरीता अधिकारी वर्गावर जबाबदारी सोपवण्यात आली,त्या पत्राची तारीख मात्र २५ एप्रिल २०२५ अशी नोंद करण्यात आली आहे.मात्र संदर्भ देतांना १० जुर्ले २०२५ चा उल्लेख बघावयास मिळत आहे.सोबतच ज्या अधिकारी वर्गांना जबाबदारी देण्यात आली,त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकामध्येही चुका असल्याचे बघावयास मिळाल्याने जिल्हा प्रशासन समितीच्या कामकाजापुर्वीच गोंधळलेल्या अवस्थेत दिसून येत आहे.

29 जुलै रोजी सकाळी 9 वाजता शसकीय विश्रामगृह गोंदिया येथे एकत्र जमणे. सकाळी 9.30 ते 10 पर्यंत शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे समितीची जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासोबत अनूसूचित जमातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना व अडचणीबाबत अनौपचारीक चर्चा. सकाळी 10 ते दुपारी 11.30 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील नगरपरिषद कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांची भरती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात तसेच शासकीय यंत्रणांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा.

         सकाळी 11.30 ते दुपारी 12 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे पोलीस अधीक्षक गोंदिया कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुपारी 12 ते 12.30 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी गोंदिया परिमंडळ कार्यालयांतर्गत येत असलेल्या गोंदिया शहर व गोंदिया ग्रामीण या कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, आरक्षण, अनुशेष आणि जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा.

         दुपारी 12.30 ते 1 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे राज्य उत्पादन शुल्क कार्यालय गोंदिया कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, आरक्षण, अनुशेष आणि जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. दुपारी 2 ते 3 पर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायंकाळी 5 पर्यंत जिल्हा परिषद कार्यालय गोंदिया येथे जिल्हा परिषद कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांची भरती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात तसेच जिल्हा परिषद यंत्रणांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा.

        सायंकाळी 5 ते 6.30 पर्यंत जिल्हा परिषद गोंदिया येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या अधिकारी/कर्मचारी यांची भरती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा. त्यानंतर शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे मुक्काम.

       30 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या तालुकानिहाय आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा/वसतिगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणाकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या योजनांबाबत केलेल्या कामांना भेटी देऊन संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा.

       31 जुलै रोजी सकाळी 10 ते 11 पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदिया येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, आरक्षण अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा.

       सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे समितीने जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा/वसतिगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणांकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या योजनांबाबत कामांना दिलेल्या भेटीच्या अनुषंगाने आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात करावयाची कार्यवाही तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व पोलीस अधीक्षक या कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या भरती, आरक्षण व अनुशेष याबाबत झालेल्या बैठकीच्यावेळी उपस्थित झालेल्या मुद्यांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही यासंदर्भात तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक व चर्चा.

blank