31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे आढावा बैठक शुक्रवारला

गोंदिया जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे आढावा बैठक शुक्रवारला

0
81

blank

गोंदिया,दि.३१ः वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्रच्यावतीने गोंदिया जिल्हा वारकरी साहित्य परिषद शाखेची आढावा बैठक उद्या शुक्रवार दिनांक 1/ 8 /2025 रोजी दुपारी १ वाजता जिल्हा परिषद गोंदियाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये वारकरी साहित्य परिषदेचा 14 वा वर्धापन दिन दिनांक 11 /11 /2025 रोजी साजरा करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे.यानिमित्ताने जिल्ह्यातील महिलांकरीता हरिपाठ स्पर्धेचे नियोजन करण्यावर आढावा बैठकीत चर्चा होणार आहे.बैठकीला वारकरी साहित्य परिषद गोंदिया जिल्हाध्यक्ष लायकराम भांडारकर ,ह.भ.प.शकुंतलाबाई मसराम( महिला जिल्हाध्यक्ष) तसेच गोंदिया जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष पुरुष,महिला व वारकरी संप्रदायातील प्रमुख मंडळी उपस्थित राहणार आहेत.

blank