34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home रोजगार/व्यापार इस्रायलमध्ये नोकरीची संधी : दीड लाखापर्यंत पगार

इस्रायलमध्ये नोकरीची संधी : दीड लाखापर्यंत पगार

0
81

blank

गोंदिया, दि.28 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आरोग्य क्षेत्रातील अर्हताप्राप्त उमेदवारांना इस्रायल देशामध्ये ‘घरगुती सहायक’ या पदाकरीता काम करणाऱ्यास इच्छुक उमेदवारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामधून उमेदवारांना चांगला पगार मिळण्याची संधी आहे. घरगुती सहायक पदाच्या सुमारे 5 हजार जागा रिक्त आहेत. याकरीता 1 लाख 60 हजार पगार असेल. उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत.

         शैक्षणिक पात्रता : उमेदवाराचे वय 25 ते 45 वयोगटातील असावे. त्याला इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असण्यासोबत त्यांच्याकडे काळजीवाहु-घरगुती सहायक सेवांसाठी निपुण, पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासाचा अभ्यासक्रम पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. तसेच मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजीओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पुर्ण केलेले असावे. तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

        पासपोर्ट आवश्यक : उमेदवाराकडे किमान 3 वर्षे वैध असणारा पासपोर्ट अनिवार्य असून यापुर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. त्याचा किंवा तिचा जोडीदार, पालक किंवा मुले सध्या इस्रायल देशामध्ये काम करत नसावे किंवा इस्रायल देशाचे रहिवासी नसावेत अशी अट आहे.

        जिल्ह्यातील तरुणांनी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, दुसरा माळा, रुम नं.210, आमगाव रोड, गोंदिया येथे संपर्क साधावा. असे रा.ना.माटे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया यांनी कळविले आहे.

blank