
लातूर,दि.२८ः– जिल्ह्यात २७ ऑगस्टच्या रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढे यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुलावरून, रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने जिल्ह्यातील जवळपास ३९ रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित झाली आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहनांची वाहतूक तात्पूरती बंद करण्यात आली आहे. रस्ते अथवा पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही वाहनासह किंवा स्वतः पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूर प्रवण क्षेत्रात जाणे टाळावे, असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत करण्यात आले आहे.
*प्रभावित रस्त्यांची यादी-*
1. माणकेश्वर – उदगीर मार्गावरील इंद्रराळ येथील पुलावरून पाणी वाहत आहे.
2. बोटकुळ निलंगा मार्गावर पुलावरून पाणी वाहत आहे.
3. अतनूर येथील पुलावरून पाणी वाहत आहे. उदगीर-अतनूर-बाराळी रस्ता बंद आहे.
4. उटी व अलमला रस्त्यावर पुलावरून पाणी जात असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक बंद आहे.
5. बैठना येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अजनी ते उदगीर वाहतूक बंद आहे.
6. औसा ते हसलगन रोडवर जवळगावाडी येथे पुलावरून पाणी जात असल्यामुळे सदर मार्गावर वाहतूक बंद आहे.
7. एकंबा येथील पुलावर पाणी आल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक बंद आहे.
8. धडकनाळ बोरगाव च्या पुलावर पाणी आल्यामुळे उदगीर ते देगलूर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
9. मौ शेळगाव तालुका चाकुर मध्ये तिरु नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे.
10. सिंगनाळ ता. निलंगा येथील ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने सिंगनाळ येथील वाहतूक बंद आहे
11. ढोरसांगवी गावचा संपर्क तुटला नदी वरून पाणी जात आहे
12. उस्तुरी ते टाकळी ता. निलंगा येथील ओद्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने उस्तुरी येथील वाहतूक बंद आहे
13. हालसी (तु.) वरून तुगाव जाणाऱ्या रस्त्यावर नदीचे पाणी आल्यामुळे रस्ता बंद आहे.
14. वायगाव पाटी ते गादेवाडी तालुका अहमदपूर रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे
15. हासोरी खुर्द ते हासोरी बु ता. निलंगा जाणाऱ्या रस्त्यावर पुलावरून पाणी वाहत आहे रस्ता बंद आहे
16. मौजे शेणकुड येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे बरेच दिवसापासून हा मार्ग बंद झाला आहे पण ढालेगाव आणि सांगवी सु असे दोन पर्यायी मार्ग चालू आहेत.
17. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नळेगाव सज्जातील हटकरवाडी एक या गावातील नदीला आलेल्या पुरामुळे हटकरवाडी ते नळेगाव हा रस्ता बंद झालेला असून पुलाच्या वरून दोन ते तीन फूट पाणी वाहत आहे.
18. नळेगाव ते लिंबाळवाडी रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असून सदर रस्ता सुद्धा बंद झालेला आहे.
19. शिरूर अनंतपाळ ते हणमंतवाडी जाणारा पुल पाण्याखाली गेला आहे
20. मौजे दैठणा तालुका शिरूर अनंतपाळ येथील श्री व्यंकट शंकर सामानगावे यांच्या राहत्या घराची भिंत संततधार पावसाने दिनांक 28.08.2025 रोजी पडली आहे.
21. अहमदपूर तालुका हासरणी ते उन्नी जांब रस्त्याच्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे सदरील रस्ता बंद झाला आहे. पर्यायी रस्ता हाडोळती मार्गे आहे
22. मौजे शिरूर अनंतपाळ ते नागेवाडी जाणारा घरणी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे.
23. नळेगाव ते लिंबाळवाडी रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असून सदर रस्ता सुद्धा बंद झालेला आहे..
24. मौजे धसवाडी येथील शेतकरी लक्ष्मण नामदेव गोजेगावकर याची गाय पाऊसामुळे नाल्यात आलेल्या पुरामुळे मयत झाली आहे
25. आनंदवाडी सुनेगाव पुलावरून पाणी गेल्यामुळे सदरील रस्ता बंद झाला आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध आहे.
26. औराद – वांजरखेडा नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे रस्ता बंद झाला आहे
27. सोनखेड ता. निलंगा किटीअवेर पुलावरून पाणी
28. औराद शहाजानी ता. निलंगा ते भालकी जाणाऱ्या रस्त्यावर भातंबरा गावात जवळ नदीचे पाणी रस्त्यावर वाहत असलेल्यामुळे रस्ता बंद झाला आहे
29. चिलवंतवाडी ते कासार बालकुंद रस्त्यावर पाणी असल्यामुळे गाडी बंद आहे
30. शिरूर अनंतपाळ जवळ घरणी नदी ला पाणी आल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्गावरील
कानेगाव व टाकळी बसेस नळेगाव येरोळमोड मोड मार्गे मार्गस्थ करण्याचे सुचना आहेत.
31. वरवंटी ते शिंदगी च्या मधील पुलावरून पाणी जात आहे
32. लातूर – निजामाबाद मार्गावर नरसी येथे नदीपुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद आहे.
33. 33. उदगीर निझामाबाद मार्ग मुखेड नियत नरसी व बिलोली च्या मध्ये तळणी येथे रस्त्यावर पाणी आल्याने सदरची वाहतूक बंद आहे. त्यामुळे सदरचे नियत नरसी येथून परत बोलावले आहे
34. शिरूर अनंतपाळ ते येरोळ-उदगीर जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असलेल्यामुळे रस्ता बंद झाला आहे
35. शिरूर अनंतपाळ ते हणमंतवाडी जाणारा पुल पाण्याखाली गेला आहे रस्ता बंद झाला आहे
36. शिरशी तालुका लातूर सरहद्द ते धानोरा ते ईजिमा-115 रस्त्यावरील साखळी क्रमांक 0/700 येथील नळकांडी पुलाजवळ भराव वाहून गेल्यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक होऊन रस्ता बंद आहे.
37. औसा तालुका मौजे पोमादेवी जवळगा ते संक्राळ रस्त्याच्या पुलावर पुराचे पाणी आलेले आहे, वाहतुकीसाठी रस्ता बंद केलेला आहे.
38. जळकोट तालुक्यातील ढोरसंगवी आणि धनगरवाडी या गावाचा लाळी बु पुलावरून पाणी जात असल्याने सम्पर्क तुटला आहे
39. नावंदी ते उदगीर ग्रामरस्तावरील ओढ्याला पूर आल्याने सध्या बंद करण्यात आला आहे.





