राजकुमार बडोले यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण )
अर्जुनी-मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे )
अर्जुनी-मोर. विधानसभा क्षेत्रातील चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाकडून प्राप्त रुग्णवाहिकेचे मंगळवारी ता. 26 आमदार राजकुमार बडोले यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.
नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने शासनाकडून हळूहळू आरोग्य सोयी सुविधा पुरविण्यात येत असून यातूनच रुग्णवाहिका प्राप्त झाली आहे. सहा उपकेंद्र मिळून जवळपास 23 हजार लोकसंख्येच्या प्राथमिक आरोग्याचा भार या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. या रुग्णवाहिकेमुळे जलद आरोग्य सेवा पुरविण्यास मदत होईल असा आशावाद यावेळी आमदार राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला. प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा देताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, डॉ. दोनोडे, डॉ. घरोटे यांनी आवश्यक पदभरती वार्षिक निधी इमारतीची गळती व अन्य आवश्यक पायाभूत सुविधांची उणीव आमदारांच्या निदर्शनात आणून दिली यावेळी पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, पंचायत समिती सदस्य सपना नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश काशिवार, सुभाष कापगते ,माजी समाज कल्याण सभापती राजेश नंदागवळी, माजी सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसरपंच अनिल बोरकर, सरपंच प्रतिभा भेंडारकर, मोहन भेंडारकर, ग्रामपंचायत सदस्य देवचंद शिवणकर, सुधाकर कुर्वे, हितेश डोंगरे, अरविंद भेंडारकर, पोलीस पाटील सुभाष मेश्राम,गोविंद कुरसुंगे व शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते





