28.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ जनतेच्या सुखसमृध्दीसाठी आमदार बडोले यांचे गणरायाकडे साकडे

जनतेच्या सुखसमृध्दीसाठी आमदार बडोले यांचे गणरायाकडे साकडे

0
47

अर्जुनी-मोर.-अर्जुनी-मोर. विधानसभा क्षेत्रातील विवीध गावांतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना भेट देवुन या विभागाचे आमदार इंजी.राजकुमार बडोले यांनी गणरायांचे दर्शन घेत जनतेच्या सुख शांती समृध्दी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
सध्या सर्वत्र गणेश उत्सव सुरु आहे. गावागावातील एकता व अखंडता व सामाजीक सलोखा कायम रहावा यासाठी बहुतांशी गावांमधे एक गांव एक गणपती ही संकल्पना दृढ होत चालली आहे. त्यामुळे सर्वत्र धार्मीक व भक्तिमय वातावरण सुरु आहे. अशा या गणेश उत्सवाचे पावनपर्वावर या विभागाचे लोकप्रिय आमदार राजकुमार बडोले अर्जुनी-मोर. विधानसभा क्षेत्रातील बकी,कोसबी,कोलारगाव, व अन्य गावांतील गणरायाचे दर्शन घेवुन जनतेच्या सुख शांती समृध्दी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.यावर्षी खरीप हंगामातील धान पिकांसाठी समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतक-यांना भरघोष उत्पादन व्हावे यासाठीही प्रार्थना केली.यावेळी सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते,पदाधिकारी व ग्रामवासी उपस्थित होते.

blank