
गोंदिया –तालुक्यातील बटाणा येथे अचानक लागलेल्या आगीत तीन घरे जळून खाक झाले. आगीत तिन्ही घरातील अन्न धान्यासह जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाली.ही घटना शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहाणी झाली नसली तरी तिन्ही घरमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सचिन रहांगडाले, नुतनलाल रहांगडाले, छत्रपाल रहांगडाले अशी पिडीत घरमालकांची नावे आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही. घटनेची माहिती स्थानिक तलाठी व तहसील प्रशासनाला देण्यात आली आहे.





