26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ एकोडी प्राथ.आरोग्य केंद्रात १२७ नागरिकांची कर्करोग तपासणी

एकोडी प्राथ.आरोग्य केंद्रात १२७ नागरिकांची कर्करोग तपासणी

0
191

गोंदिया,दि.३०ः कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे व नागरिकांना मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन गोंदिया जिल्ह्यात दि.21 ऑगस्ट पासुन दाखल झाली असुन आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 33 आरोग्य संस्थेतील गावात मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन द्वारे महिला व पुरुषांची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.
या व्हॅनद्वारे शहरासह ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची मोफत कर्करोग तपासणी केली जात आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन एका दिवसात शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी करण्याची क्षमता या व्हॅनमध्ये असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार यांनी दिली आहे..
आज दि.29 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी येथे कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 127 नागरिकांनी मोबाइल कॅंसर व्हॅनमध्ये आपली तपासणी केली असुन त्यात 68 मुख कर्करोग,21 महिलांची गर्भाशय कर्करोग,38 महिलांची स्तन कर्करोग संबधाने तपासणी केल्याची माहीती वैद्यकिय अधिकारी डॉ.वैशाली बिसेन यांनी यावेळी दिली आहे.मोबाईल व्हॅनमध्ये ए.सी.तपासणी कक्ष असून मुख कर्करोगासाठी डेंटल चेअर, स्तन कर्करोगासाठी प्रगत तपासणी यंत्रणा व गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कोल्पोस्कोप यंत्र आहे.
मोबाइल कॅंसर व्हॅनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.पलास गणवीर,मुखरोग तज्ज्ञ डॉ.अनिल आटे व शल्यचिकित्सक डॉ.तुषार डहाके यांचे सह त्यांची चमु द्वारे तपासणी करण्यात आली.तपासणी झालेल्या संशयितांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
कॅन्सर तपासणी शिबीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव व वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बिसेन यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते.कॅन्सर तपासणी शिबिराला पदाधिकारी जि.प.सदस्य अश्विनीताई पटले तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव, तालुका पर्यवेक्षक महेश चिंधालोरे व बघेले यांनी भेट देवुन दिली पाहणी केली आणि यावेळी अधिकाधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मंगेश कांबली,डॉ.निलम बघेले व डॉ.सोनल कांबळे आरोग्य सेविका सुषमा सारवे व उमा हट्टेवार,आरोग्य सहाय्यक बडोले,आरोग्य सहायिका कुमुद तुरकर,फार्मासिस्ट कोमल मेश्राम यांचेसह प्राथमिक आरोग्य केंद्रातील व अंतर्गत उपकेंद्रातील सर्व अधिकारी,कर्मचारी व आशा सेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.

blank