
परभणी, दि. ३१ – अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात काही भागात शेत पिके व रस्त्यांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी आज पुयनी-पालम रस्त्याला भेट दिली. येथील पर्यायी वळण रस्ता पावसाने वाहून गेल्यामुळे वाहतूक बंद झालेली आहे. या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने
तात्काळ दुरुस्ती करावी, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी पुयनी व पालम शिवारातील शेत पिकांच्या नुकसानीचीही पाहणी केली.
यावेळी गंगाखेड उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.





