26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीस सज्ज व्हा – माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीस सज्ज व्हा – माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे

0
71

शिवसेना पक्ष तालुका आढावा बैठक अर्जुनी मोरगाव
अर्जुनी-मोर.-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनुषंगाने दिनांक 30 ऑगस्ट शनिवार रोजी शिवसेना शिंदे गट अर्जुनी मोरगाव शहरातील नगर पंचायत सभागृहात आढावा बैठक झाली. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार तथा शिवसेना नागपुर लोकसभा संपर्कप्रमुख मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते. उपस्थित असलेल्या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले.

माजी आमदार चंद्रिकापुरे यांनी गाव तिथे शिवसेनेची स्थापना करा. पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपल्या निवडून लढण्यासाठी शिवसैनिकांनी तत्पर असले पाहिजे असे सांगितले. तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील व नगर पंचायत भागातील संपूर्ण माहिती देऊन सर्कलनिहाय जिल्हा परिषद व नगर पंचायत हद्दीतील वॉर्डनिहाय शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या २५ दिवसांत करण्यात येतील, असे आश्वासित केले. तसेच जि. प., पं. स. सर्कल प्रमुख व अर्जुनी मोरगाव शहरातील पदाधिकारी यांनी निवडणुकीआधी पक्ष बांधणी करायची आहे. त्याकरिता स्वतः सर्व सर्कल पिंजून काढीत पक्ष मजबूत करण्यासाठी सहकार करावे. एकेक शाखाप्रमुख, प्रभाग प्रमुख आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे पक्षातील सर्व मतभेद बाजूला ठेवून आपण पक्ष बांधण्यासाठी काम करावे, असे आवाहन केले.

यावेळी संजय ईश्वर, यशवंत शहारे,प्रमोद डोंगरे, देवा डोंगरवार,भूषण शेंडे, आशिष लंजे, कुंडलिक लोणारे, मन्साराम डोंगरवार, राजकुमार शहारे, मायाताई, राधेश्याम भैसारे, संदीप लाडे,बुद्धविजय धाकडे,फाल्गुन नखाते, वीरेंद्र ठाकरे, अनिल घरडे, तुषार लोडगे,शुभम नेवारे,सौरभ पेटकर,निशाताई मस्के, साविताई भलावी, रीनाताई सांगोळे, पुष्पा जांभुळकर, उज्वलाताई शैलेश खोब्रागडे, आरती मेश्राम, सुगंधाताई शहारे, रंजनाताई शहारे, दुर्गाताई दुर्योधन शहारे,सुजाताई प्रशांत खोब्रागडे,अश्विनी विवेक खोब्रागडे, शीलाताई ज्ञानेश्वर प्रधान, ज्योती रामटेके, भास्कर लांजेवार,आत्माराम वाडगुरे, नरहरी जांभूळकर, अनिकेत भलावी, तसेच शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

blank