नागपूर: “सर्व जाती व धर्माचे लोक समान आहेत, त्यामुळे जात पाळणे ही महाभंयकर अंधश्रध्दा आहे असे मत बहुजन विचारवंत व पाक्षिक बहुजन संघर्शचे संपादक नागेश चौधरी यांनी व्यक्त केले. ते ” सर्व जाती समान आहेत. कोणतीही जात उच्च वा नीच नाही” या विषयावरील आयोजित चर्चासत्रात ते चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. या चर्चासत्राचे आयोजन ३१ ऑगस्ट रविवारला उमरेड रोड वरील सक्करदरा परिसरातील सेवादल शिक्षण संस्था येथील सभागृहात करण्यात आले होते. या चर्चासत्रात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष व सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इंजि.संजय शेंडे, महिला सक्षमीकरण कार्यकर्त्या प्रा.माधुरी दुपटे/गायधनी, शाहू आंबेडकरवादी विचारवंत प्रदिप शेंडे व वर्धा येथील बहुजन चिंतक सुरेश बोरकर वक्त्यांनी या विषयावर आपले मत व्यक्त करीत भ्रामक असलेली जातीची संकल्पना लोकांनी आपल्या मानसिकतेतून घालवून “सर्व जाती व धर्माचे लोक जीवनदृष्ट्या समान आहेत. कुणीही उच्चनीच वा शत्रू नाहीत ” यावर मांडणी करीत मानतेची बाजू उचलून धरली. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, दत्तात्रयनगर शाखा, बहुजन संघर्श समिती व नवउन्मेषण साहित्य सभा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात होते.
कार्यक्रमाचे संचालन मुख्य आयेजक विनोद उलीपवार यांनी केले तर सुधाताई बामनपल्लीवार यांनी भूमिका मांडली. आभार संजय भलमे यांनी मानले.कार्यक्रमात विजय बाभुळकर,कृश्ना सरोदे,,रंजना कोल्हे, पांडुरंग काकडे, दिवाकर शंभरकर (वर्धा), बाबा बीडकर, अनुज हुलके,दिवाकर शिर्के, अपेक्षा अमीन दिवान, शुभांगी घाटोळे, मालती वराडे, एड.समीक्षा गणेशे, वंदना वानकर, सुरेंद्र बुराडे, प्रा. प्रभाकर पावडे, हरीश देशमुख, अनिता काळे, मिलिंद खैरकर, नामदेव खाटीकर, इंद्रपाल जौंजाळकर, नरेश सहारे, रजत जुनघरे, मृणाल दुपटे, अमर्त दुपटे,शेषराव रामटेके, संजय बेले, प्रकाश वाडीभस्मे, मीरा मदनकर, सुरेश पानतावणे, माधुरी वसंत शोभा,अभिशेक सारनाथ, डाॅ.निखिल भुते यांचेसह बरेच समतावादी कार्यकर्ते उपस्थित होते.





