28 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ नागपूरात भटके विमुक्त दिनी विद्यार्थ्यांचा सत्कार

नागपूरात भटके विमुक्त दिनी विद्यार्थ्यांचा सत्कार

0
28

नागपूर :- इतर मागास बहुजन कल्याण विभागा तर्फे व भटक्या विमुक्त जमातीच्या सर्व संघटनाच्या संयुक्त विद्यमाने भटके विमुक्त मुक्ती दिवस अतिशय उत्साहात साजरा , महाराष्ट्र सरकारने ३१ ऑगष्ट दिवस हा भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्याचे पत्रक काढल्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात  कैलास राऊत अध्यक्ष, गोवारी योजना अमलबजावणी महाराष्ट्र, मिलिंद नारंगे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती नागपूर, विजय वाकुलवार प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग नागपूर, धनराज सहारे साह्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूर, योगेश बन, किशोर सायगण, महेश गिरी, अनिल पुरी, राजेंद्र बढिये, अमोल बावणे, श्री नानवटकर,, श्रीराम गोहणे, नायक राठोड आणि विविध संघटनेचे पदाधिकारी स्टेज वर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री आडे यांनी केले, तर प्रास्ताविक विजय वाकुलकर यांनी केले. १८७१ च्या संपूर्ण इतिहासाची मांडणी व मागण्या मुकुंद अडेवार प्रदेश कार्यवाह विमुक्त घुमन्तु जनजाती विकास परिषद (अ.भा.) यांनी सविस्तर मांडली. यावेळी बंजारा, मुस्लिम मदारी, पांगुळ, भाई, गोंधळी, गोसावी समाजाच्या लोकांनी आपली कला प्रदर्शन करून आम्ही सांस्कृतिक जतन करणारे आहोत याचा संदेश दिला.
महाज्योती मध्ये टॉप केलेल्या मुलांचा सन्मान करण्यात आला. जात वैधता प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र यांचा वाटप करण्यात आला.बेलदार, बंजारा, वंजारी, लोहार, धनगर,ओतारी, भोई, पांगुळ, गोसावी, मुस्लिम मदारी, भामटी, गोधळी, नाथजोगी, भरवाड, अश्या अनेक जाती व उपजातीचे शेकडो लोक या कार्यक्रमात उपस्थित होते.

blank