26.5 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home गुन्हेवार्ता धुळे शहरात ३६७ ठिकाणी दोन नंबरचे धंदे सुरू-रणजीतराजे भोसले

धुळे शहरात ३६७ ठिकाणी दोन नंबरचे धंदे सुरू-रणजीतराजे भोसले

0
47

७५ कोटींची उलाढाल; अधिकार्‍यांचे वर्तन राजकीय प्रतिनिधींसारखे

धुळे – धुळे शहर अवैद्य धंद्यांची राजधानी बनली आहे. शहरांमध्ये एकूण ३६७ ठिकाणी अवैद्य, दोन नंबरचे धंदे सुरू असून धुळ्यात या अवैध धंद्याच्या माध्यमातून ७५ कोटी रुपयांची उलाढाल होते आणि ज्यांनी कारवाई करायला हवी ते येथील प्रशासनातले अधिकार्‍यांचे वर्तन राजकीय प्रतिनिधी असल्यासाखरे झाले आहे, असा खळबळजनक दावा करीत धुळे शहरातील दोन नंबरचे अवैध धंदे तात्काळ बंद करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
धुळे शहरात वाढलेल्या अवैध धंदे आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावर सत्ताधारी पक्षासह पोलिस प्रशासनावर गंभीर प्रकारचे आरोप करीत आज राष्ट्रवादी कॉंगे्रस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले यांनी जोरदार निशाणा साधला. त्यांनी थेट कोणत्या प्रकारचे बेकायदेशीर धंदे शहरात किती प्रमाणात सुरु आहेत. याची एक यादीच पत्रकार परिषदेत सादर केली.
रणजीतराजे भोसले यांनी यावेळी सांगितले की, धुळे शहरांमध्ये दोन नंबरचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. अवैध दोन नंबर धंद्यामुळे शहरातील वातावरण खराब होत आहे. धुळे शहरातील तणाव, मारामार्‍या, खून, दरोडे, चोर्‍या यांच्या कारण मुख्यतः म्हणजे धुळे शहरात चालणारे दोन नंबरचे अवैध धंदे आहेत. आज धुळे शहरांमध्ये विविध प्रकारचे दोन नंबरचे अवैध धंदे सर्रासपणे चालू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सट्टा, सट्टापेढी, मटका, चक्री, अवैद्य गॅस, गांजा, कोरेक्स बॉटल, सोरट, गुटखा विक्री, बनावट दारू, चोरीचे भंगार, अवैध जनावर वाहतूक, वाळू तस्करी, डुबलीकेट डांबर, केमिकल, टायगर, काला पिला, अवैद्य जनावरे वाहतूक, फोर पीस, चोरी व विमाच्या गाड्यांचे स्क्रबिंग अशा विविध स्वरूपाचे दोन नंबरचे अवैध धंदे धुळे शहरांमध्ये सुरू आहेत. आमच्या माहितीनुसार धुळे शहरांमध्ये जवळपास विविध प्रकारचे ३६७ ठिकाणी दोन नंबरचे अवैध धंदे सुरू आहे. काही ठिकाणच्या दोन नंबर व अवैध धंद्यांना राजकीय व प्रशासकीय पाठबळ मिळालेले आहे.
पोलीस विभागातील काही अधिकारी, कर्मचारी या अवैध धंद्यांना पाठबळ देत आहे. यामुळे धुळे शहराचे वातावरण कुलुशीत झालेले आहे. गोरगरीब, कष्टकरी जनतेकडून अवैद्य धंद्यांच्या मार्फत करोड रुपये कमवून काही अधिकारी, कर्मचारी गब्बर झाले आहेत. या सर्व गोष्टींमुळे धुळे शहरांमध्ये गुंडगिरी, दादागिरी, चौकाचौकात टपोरी गुंड यांचे प्रमाण वाढलेले आहे. एवढेच नव्हे तर शहरात अनेकांकडे सर्रासपणे गावठी कट्टा, पिस्तूल, तलवारी, चॅपर, फायटर, बेकायदेशीर हत्यार दिसून येते. त्यांना कोणाचे भय राहिलेले नाही.धुळ्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांकडे हत्यारे दिसून येतात, ही धोकादायक बाब आहे. या दोन नंबरच्या अवैद्य धंद्यांना जनता कंटाळली आहे. या प्रकारांमुळे धुळे शहरात नवीन बाहेरून लोक येण्यास घाबरत आहेत. धुळे शहराचा विकास खुंटलेला आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार अवैद्य धंदे आहेत. असा दावा यावेळी रणजीत भोसले यांनी केला.
पोलीस प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करून धुळे शहरातील अवैद्य दोन नंबरचे धंदे त्वरित बंद करावे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून गावठी कट्टा, पिस्तूल, तलवारी, चॅपर,फायटर, बेकायदेशीर हत्यारे जमा करावीत. दिनांक ५ मे २०२५ रोजी रणजीत राजे भोसले यांनी लेखी पत्र देऊन पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी केली होती तसेच जून महिन्यामध्ये पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.अवैद्य दोन नंबरच्या धंद्यांवर कारवाई झाली नाही तर लवकरच आम्ही शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्रीची भेट घेणार आहोत. व त्यांना सर्व पुरावे सादर करणार आहोत. असे रणजीत राजे भोसले यांनी सांगितले.

blank