25.1 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ जि.प.शाळा मोहगाव व झांजीया येथे हिवताप-डेंग्यु जनजागृती

जि.प.शाळा मोहगाव व झांजीया येथे हिवताप-डेंग्यु जनजागृती

0
52

किटकशास्त्रीय तंत्रज्ञ अनिल चोरवाडे यांनी दिले हिवताप-डेंग्यु आजारावर मार्गदर्शन

गोरेगाव,दि.०३ः सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार,जिल्ह्यात पावसाळ्यात किटकजन्य आजारा आजाराबाबरात जनजागृती करण्यात येत आहे.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व शाळा,महाविद्यालय व आश्रमशाळेत आरोग्य विभागामार्फत किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.गोरेगाव तालुक्यातील  जिल्हा परिषद शाळा मोहगाव व झांजीया येथे किटकजन्य व जलजन्य आजाराबाबत विविध विषयावर मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

कीटकशास्त्रीय तंत्रज्ञ अनिल चोरवाडे यांनी जिल्हा परिषद शाळा मोहगाव व झांजीया येथे विद्यार्थीशिक्षक आणि पालकांना बॅनरच्या माध्यमातुन डासांचे प्रकार व त्यापासुन होणारे आजार,त्यांचे लक्षणे आणि डासांचे जीवनचक्र अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.विद्यार्थ्यांना अ‍ॅनोफिलीस मादी,एडीस आणि क्युलेक्स इत्यादी कीटक ओळखण्यासंबधी माहीती देण्यात आली,हिवताप आजाराबाबत्त डासांचे जीवनचक्र,पाण्यात डासांची होणारी वाढ, डासामध्ये प्लासमोडीयम जंतुची वाढ व हिवताप जंतु भारीत परिपक्व प्रौढ डास मानवाला चावल्यानंतर मानवाच्या रक्तात व अवयवात आढ्ळणारे बदल,किटकशास्त्रीय सर्वेक्षण,हिवताप नियंत्रणासाठी लार्वा व प्रौढ डास यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याची विस्तृत माहीती उपस्थितांना दिली.

 अनिल चोरवाडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देवुन त्यांच्या विविध शंकेचे निरसन केले.आरोग्य शिक्षण कार्यक्रम उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख,शिक्षकवृंद तसेच आरोग्य विभागामार्फत आरोग्य निरिक्षक,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका व आशा सेविका उपस्थित होते.

blank