गोंदिया,दि.०१-: वन्यजीव सप्ताहानिमित्त आज 1 ऑक्टोबर रोजी वनभवन येथे उपवनसंरक्षक जोंग यांच्या हस्ते वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयातील रासेयो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर वनविभागाच्या कार्यालयापासून गुजराती हायस्कूलपर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी वन्यजीवांचे संरक्षण करण्याची शपथ घेतली.
वन्यजीव सप्ताह साजरा करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.उपस्थित मान्यवरांमध्ये उपवनसंरक्षक जोंग,विभागीय वन्यजीव वनअधिकारी देवकर,विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण तुषार ढमढेरे,सहाय्यक वनसरंक्षक श्री.तडस,डॉ.के.पी.घोषाल,राजकुमार पटले रासेयो कार्यक्रम अधिकारी धोटे बंधु विज्ञान महाविद्यालय,कौशिक वनपरिक्षेत्र अधिकारी,भगत वनपरिक्षेत्र अधिकारी गोंदिया तसेच वनविभागाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमास एकूण सुमारे 150 NSS स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी झाले.





