24.6 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ मातामाय देवस्थान कटंगी बु. येथे भव्य जस स्पर्धेचे यशस्वी आयोजन

मातामाय देवस्थान कटंगी बु. येथे भव्य जस स्पर्धेचे यशस्वी आयोजन

0
33

गोरेगाव,दि.०१: शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोरेगाव तालुक्यातील मातामाई देवस्थान संस्थान कटंगी येथे यशस्वीतेने भव्य जस गायन प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. प्रतियोगितेत पारंपारिक जस वाद्य सहित संगीतमय पद्धतीने ऐकायला मिळाले. सर्व जस मंडळांनी आपापल्या कौशल्यानुसार मातामाय देवस्थान वर जस लिहिले होते व उत्कृष्ट वाद्याद्वारे मातामाय देवस्थान वर जस गायन केले. पारंपारिक पद्धतीची जस प्रतियोगितेत असंख्य जस मंडळांनी उत्कृष्ट पणे सहभाग घेतले व यशस्वीपणे संगीतमय वातावरणात कार्यक्रम पार पडला. पारंपारिक जस ला आपल्या कौशल्यांची जोड देत महिलांनी व भक्तांनी उत्कृष्टपणे सहभाग नोंदवला हा कार्यक्रम जस परंपरा कायम ठेवण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली त्यात मातामाय देवस्थानचे अध्यक्ष रेखलालभाऊ टेंभरे,जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर गोंदियाचे प्रसिद्ध उद्योगपती राजकुमार असाटी, मातामाय देवस्थानचे सचिव फणेंद्रजी हरीणखेडे, कोषाध्यक्ष व स्पर्धेचे परीक्षक भरत हरिणखेडे,बारसागडे,अंकुश बघेले सो. स.अध्यक्ष पूर्ती संस्था, सुरेश चोपकर ,जामवंत राऊत, प्रवीण डोमळे, तन्मय बघेले, मुकेश बघेले, दीपक बघेले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.