भंडारा,दि.०१ः रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दहेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इंग्रजी-गणित विषयाचे तज्ज्ञ, उपक्रमशील शिक्षक सुधाकर संग्रामे यांना नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महात्मा फुले सांस्कृतिक भवन फातीमानगर, वानवडी पुणे येथे शिक्षण व सामाजिक कार्यासाठी विशेषत्वाने दिला गेला आहे. या पुरस्कारासह त्यांना शाल, सुवर्णपदक, सन्मानचिन्ह, आणि प्रमाणपत्र देखील देण्यात आले. त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत केलेल्या अनेक शैक्षणिक, सामाजिक कार्याला नवीन उंची लाभली.याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद, उपाध्यक्ष भरत पाटील, संजय खटके व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश नंदागवळी,वामन नाईक, पृथ्वीराज वासनिक,निशिगंध ढोलणे यांनी शाळेच्या वतीने अभिनंदन केले. तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्काराबद्दल बोलतांना श्री.संग्रामे म्हणाले की, याचे सर्व श्रेय आजपर्यंत आसंगी तुर्क, सावळज जि.सांगली व दहेगाव जि.भंडारा येथील विविध विद्यार्थी, पालक व अधिकारी तसेच निवड समिती यांना दिले.





