
गोंदिया,दि.०३ः अंबिका सार्वजनिक वाचनालय कारंजा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आनंद कुकडे,माजी तालुका आरोग्य अधिकारी देवरी होते.कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कारंजा सरपंच नोकचंद कापसे होते.कार्यक्रमाचे विठ्ठलराव हरडे उपसरपंच,माजी उपसरपंच मीताराम हरडे,वाचनालयाचे फनेंद्र हरिणखेडे,तंटामुक्त अध्यक्ष सुभाष मळावी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले.कार्यक्रमात सर्व ग्राम पंचायत सदस्य अंबिका सार्वजनिक वाचनालयाचे सर्व पदाधिकारी व गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.जयंती निमित्त प्रमुख पाहूने अध्यक्ष डॉ.कुकडे यांनी खुप चांगले मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव टेकचंद बलभद्रे यांनी केले व आभार मारोती भिमटे यांनी केले. कार्यक्रम सर्व पदाधिकारी व सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.




