30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यात २१९ अनुकंपा धारक उमेदवारांना नियुक्ती पत्र मिळणार

गोंदिया जिल्ह्यात २१९ अनुकंपा धारक उमेदवारांना नियुक्ती पत्र मिळणार

0
239

गोंदिया,दि.०३: मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील बेरोजगारांना न्याय देण्याच्या आणि शासन सेवेत संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
या उपक्रमाअंतर्गत अनुकंपा धारकांची भरती तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश शनिवारी 4 ऑक्टोंबरला प्रदान करण्यात येणार आहेत.

गोंदिया जिल्ह्यात हा कार्यक्रम कार्यक्रम शनिवारी सकाळी ११.०० वाजता, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आयोजित करण्यात आलेला आहे. राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते २१९ उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटप केले जाणार आहेत.हा उपक्रम मुख्यमंत्री यांच्या सुशासन व पारदर्शक भरती प्रक्रियेच्या संकल्पनेशी सुसंगत असून, जिल्ह्यातील युवकांना शासन सेवेत नवी दिशा व प्रेरणा मिळणार आहे.सर्व निवड झालेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे.