24.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home गुन्हेवार्ता पुराडा येथील शेततलावात आढळले तीन युवकांचे मृतदेह

पुराडा येथील शेततलावात आढळले तीन युवकांचे मृतदेह

0
471

गोंदिया,दि.०६ः जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील पुराडा येथे एका शेततळ्यात तीन युवकांचे मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवार ५ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.अभिषेक आचले(२०),आदित्य बैस (१६),तुषार राऊत (१८) तिघेही राहणार पुराडा अशी मृत युवकांची नावे आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हे अपघात की घातपात अशा शंकांना पेव फुटले आहे.
तिघेही युवक पुराडा येथील शेतशिवारात असलेल्या शेततळ्यामध्ये पोहायला गेल्याची माहिती आहे.पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.दरम्यान रात्री उशिरा तिघांचेही मृतदेह पाण्या बाहेर काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनेची नोंद सालेकसा पोलिसांनी केली आहे.