
गोंदिया : राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार आहे. हा शासन निर्णय रद्द करावा तसेच २०१४ पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी, या दोन मागण्या शनिवारी ओबीसी संघटनांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी नागपुरात महामोर्चा होणारच, अशी भूमिका सकल ओबीसी समाज तसेच ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने घेण्यात आली आहे. याबाबत आज (ता.६) पत्र परिषद घेवून ओबीसी बांधवांनी महामोर्च्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलु कटरे यांनी केले.
सकल ओबीसी महामोर्चा प्रतिनिधींची मुख्यमंत्री यांची भेट घेतली. दरम्यान झालेल्या बैठकीत विविध राज्यातील विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. २ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरने ओबीसी समाजाच्या हक्काचे आरक्षणाला धक्का लागणार आहे. २ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर राज्यात १२ ओबीसी तरुणांनी आत्महत्या केल्याची माहिती तसेच शासन निर्णयातील चुक एड मंगेश ससाणे यांनी मुख्यमंत्र्याच्या समोर ठेवली. काही ठिकाणी दोन समाजात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. गावपातळीवर अनेक ठिकाणी खाडाखोड करून प्रमाणपत्र तयार केली जात आहेत, मराठवाड्यात दोन समाजात वितुष्ट निर्माण झाले आहे, एकमेकांच्या लग्नाला जाणं टाळत आहेत, शाळांमधून विद्यार्थ्यांना काढायला सुरुवात झाली आहे. ज्या गतीने जात प्रमाणपत्र वाटली जात आहेत, त्यातून येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व राहणार नाही, असा धोक्याचा इशारा बैठकीत दिला. दरम्यान राज्य शासनाने ओबीसी संघटनांकडून ठेवण्यात आलेल्या तीन महत्वपूर्ण मागण्या मान्य न केल्याने चर्चा फिस्कटली. यामुळे सकल ओबीसी समाज आपल्या मागण्यांना घेवून ठाम भुमिका जाहिर केली आहे. यानुसार आयोजित १० ऑक्टोबर महामोर्चा होणारच, अशी भूमिका सकल ओबीसी समाज तसेच ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने घेण्यात आली आहे. याबाबत आज (ता.६) पत्र परिषद घेवून ओबीसी बांधवांनी महामोर्च्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलु कटरे यांनी केले. यावेळी अमर वर्हाडे, बंटी पंचबुध्दे, धनलाल ठाकरे, सुनील पटले, मनोज मेंढे, विनोद हरीणखेडे, ऋषीकांत शाहू, खेमेंद्र कटरे, डॉ.राजकुमार यादव, क्रिष्णा कठाणे, जितेंद्र कटरे, जीवन शरणागत, दुर्गा ठाकरे, महेंद्र बिसेन आदिसह ओबीसी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते





