25.5 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ प्रस्तावित रुग्णालयात नागरिकांना उत्तम सुविधा द्या-आमदार राजू कारेमोरे

प्रस्तावित रुग्णालयात नागरिकांना उत्तम सुविधा द्या-आमदार राजू कारेमोरे

0
3

* मिटेवाणी,वरठी,तुमसर/मोहाडी येथील रूग्णसेवेबाबत चर्चा

भंडारा,दि ७ : तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदारतत्पर आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून आरोग्य यंत्रणेने काम करावेअशा सूचना आमदार राजू कारेमोरे यांनी दिल्या.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मोहाडी येथे प्रस्तावित रुग्णालयाच्या जागेसंदर्भात तसेच मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार राजू कारेमोरेजिल्हाधिकारी सावन कुमारजिल्हा शल्यचिकित्सक संदीप गजभियेडॉ. संदीप गोंधळेडॉ. सचिन बाळूदेडॉ. शेखर चोपकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 तुमसर-मोहाडी मतदारसंघातील मिटेवाणीवरठी आणि तुमसर/मोहाडी येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रस्तावित रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना आधुनिक व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यातयासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

 प्रस्तावित रुग्णालयांमध्ये आयसीयूरक्तपेढीएमआरआयसिटी स्कॅनप्रसूतिगृह यांसह आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच उपलब्ध वैद्यकीय उपकरणांची नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यात यावीजेणेकरून तांत्रिक अडचणींमुळे रुग्णांची गैरसोय होणार नाहीयाची दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी संबंधित यंत्रणेला देण्यात आले.